ठाण्यात शिंदे गटाच्या अडचणीत वाढ, भाजप सोडणार साथ? बैठकीत ठरला मोठा प्लॅन

ठाण्यात शिंदे गटाच्या अडचणीत वाढ, भाजप सोडणार साथ? बैठकीत ठरला मोठा प्लॅन

Thane Lok Sabha : अनेक चर्चांनानंतर महायुतीतील (Mahayuti) घटक पक्षांनी ठाणे लोकसभेची (Thane Lok Sabha) जागा शिंदे गटासाठी सोडली. यानंतर शिंदे गटाकडून ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, ही जागा शिंदे गटाकडे गेल्याने ठाण्यात भाजपमध्ये (BJP) नाराजी आहे. यामुळे याचा मोठा फटका शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांना बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

माहितीनुसार, आज सकाळी मुंबईतील भाजपचे बडे नेते आणि आमदार गणेश नाईक यांची बैठक झाली आहे. या बैठकीत ठाण्याची जागा शिवसेनेला गेल्याने अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून ठाणे लोकसभा मतदारसंघात संजीव नाईक नागरिकांशी भेटी- गाठी करत होते मात्र ठाण्याची जागा शिंदे गटासाठी सोडल्याने भाजपमध्ये नाराजी आहे.

या बैठकीमध्ये नवी मुंबईतील भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांकडे आपली नाराजी व्यक्त करत राजीनामे देण्याचा पवित्रा घेतला होता मात्र जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांनी त्यांनी समजूत काढली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तरीही देखील शिवसेना उमेदवारच प्रचार करणार नसल्याची भूमिका यावेळी भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. जर असं झालं तर शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांना ही निवडणूक टफ जाऊ शकते.

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन निवडणुकीतही महिला आरक्षण

या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी ही जागा शिवसेनेला का सोडली ? असा सवाल करत संजीव नाईकांच्या जागी विनय सहस्रबुद्धे, केळकरांना उमेदवारी दिली असती तरीही चाललं असतं. आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही त्याऐवजी उटी, गोवा, म्हैसूरला जाऊ आणि मतदानाच्या दिवशी येऊ अशी भूमिका या बैठकीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली असल्याची माहिती आहे. यामुळे आता भाजप या निवडणुकीपासून दूर राहणार का ? हे असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज