समाजाला उपदेश द्या, पण पोलिसांना कुठं…पोलिसांकडून ‘चैतन्य महाराजांना’ कायद्याचा डोस
Chaitanya Maharaj Arrested : सोशल मीडियावर चर्चा असलेल्या कीर्तनकार चैतन्य महाराजांचा एक प्रताप समोर आलायं. समाजमाध्यमांवर रिल्सच्या माध्यमातून समाजाला उपदेश देणाऱ्या चैतन्य वाडेकर (Chaitanya Wadekar Maharaj) महाराजाला एका प्रतापामुळे पोलिसांना कायद्याचा डोस द्यावा लागलायं. आपले तीन भाऊ आणि साथीदारांच्या मदतीने जेसीबीने खाजगी रस्ता अन् कंपाऊंड उखडल्याप्रकरणी चैतन्य वाडेकर महाराजांना अटक करण्यात आलीयं.
चाकण एमआयडीसी हद्दीत चैतन्य महाराज वास्तव्यास आहेत. याच भागातील एका बांधकाम व्यावसायिकासोबत त्यांचे जमीनीच्या मुद्द्यावरुन जुने वाद आहेत. या बांधकाम व्यावसायिकाने महाराजांच्या घरालगतची जागा विकसित करुन त्याच ठिकाणी कंपनी उभारुन रस्ता आणि कंपाऊंड बांधलंय. मात्र, या बांधकाम व्यावसायिकाने माझ्या जमीनीच्या हद्दीत हा रस्ता आणि कंपाऊंड बांधल्याचा दावा महाराजांकडून केला जातोयं.
Pune Crime: ‘गुड टच बॅट टच’ उपक्रमात चिमुरडीने सांगितले वडिलांचे प्रताप; आरोपी बापाला अटक
महाराज आणि बांधकाम व्यावसायिकाचा वाद अखेर न्यायालयात गेला. अनेक सुनावण्या झाल्या त्यानंतर महाराजांच्या बाजूने निकाल लागला. न्यायालयाच्या निकालानंतर ही जागा महाराजांचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया होणे बाकी होतं. ही प्रक्रिया पूर्ण न होताच चैतन्य महाराजांनी आपले तीन भाऊ आणि इतर साथीदारांच्या मदतीने रस्ता आणि कंपाऊंड जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकले.
‘सावरकरांबद्दल आदर म्हणूनच मी 1983 ला …’, आत्मचरित्रात सुशीलकुमार शिंदेंनी केला मोठा खुलासा
या प्रकरणी महाळूंगे पोलिस ठाण्यात गुन्हा झाला. महाराजांसह तीन भाऊ आणि इतर साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र, चैतन्य महाराजांकडून मी प्रसिद्ध कीर्तनकार समाजपयोगी उपदेश करीत असल्याचं सांगत पोलिसांनाच थेट उपदेश करीत असल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला पोलिसांनी महाराजांचं म्हणणं ऐकूनही घेतलं खरं, पण काही केल्या महाराजांची अगरबत्ती सुरुच असल्याने पोलिसांनी शेवटी त्यांना कायद्याचा डोस देत अटक केली.
दरम्यान, समाजाला आपण किती महान आहोत याबाबत दाखवून देणाऱ्या व्यक्तींचा खरा चेहरा काही वेगळाचं असतो, हे या प्रकरणावरुन दिसून येत आहे.