Shiv Rajyabhishek ceremony : 6 जून 1674 रोजी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला औपचारिक राज्याभिषेकानंतर शिवराय हे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाला आज 350 वर्षे पूर्ण झाली. आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा (Coronation ceremony) धुमधडाक्यात साजरा झाला. या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांचा जनसागर लोटला. ( State government Published Post Ticket on Shiv Rajyabhishek ceremony )
रायगडवर अभूतपूर्व गर्दी; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, गडाचे दरवाजे बंद
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानिमित्त राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात आज 6 जूनला मुंबईतील राजभवन येथे देखील कार्यक्रम पार पडला यावेळी राज्यसरकारने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने विशेष टपाल तिकीट काढलं आहे. राजभवनाच्या दरबाल हॉलमध्ये या टपाल तिकीटाचे प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Shivrajyabhishek Din : लोकसभेची भीती, मोदींचा मौल्यवान वेळ; शिंदे सरकारचं अॅडव्हान्स सेलिब्रेशन
दरम्यान दुसरीकडे रायगडावर मात्र तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा (Coronation ceremony) धुमधडाक्यात साजरा होत असताना या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांचा जनसागर लोटला. यावेळी रायगडावर ही गर्दी अनावर झाल्याचं पाहताच पोलिसांनी ही गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. गर्दी पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांनी शिवभक्तांवर सौम्य प्रमाणात लाठीचार्ज केला. त्यानंतर हळूहळू सर्व शिवभक्तांना किल्ल्यावरून खाली पायवाटेने सोडण्यात आलं.