Ashutosh Kale : ज्या दिवशी कोपरगाव शहरात गोळीबार प्रकरण घडले त्याच दिवशी पोलिसांना बाहेरच्या गुंडांना कोपरगाव शहरात थारा देवू नका अशा कडक सूचना दिल्या होत्या मात्र निवडणुका जवळ आल्याने विरोधकांकडे विकासावर बोलायला काहीच नसल्याने ते जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी विरोधकांवर केली. ते आज कोपरगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव शहराच्या विकासासाठी आजपर्यंत साडे तीनशे कोटी रुपयांचे निधी मंजूर करून आणले आहे आणि या शहराचा वर्षानुवर्षापासूनचा प्रलंबित असलेला पाणी प्रश्न सोडवला आहे तसेच भूमिगत गटारीसाठी 323 कोटी निधीला तांत्रिक मंजुरी मिळून हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला त्यामुळे आता शहराच्या विकासासाठी जवळपास 700 कोटी निधी मिळणार आहे त्यामुळे आता विरोधकांकडे बोलायला काहीच नसलेल्या विरोधकांकडून गोळीबार प्रकरणातून चुकीचे आरोप करण्यात येत आहे असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आशुतोष काळे म्हणाले.
कोपरगावची शांतता अबाधित रहावी यासाठी गोळीबार प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे आणि या घटनेचा तपास करून पोलीस सत्य परिस्थिती बाहेर आणणार आहे असेही यावेळी ते म्हणाले. जर गर्दीत एखाद्या व्यक्तीने ज्याला मी ओळखत नाही त्या व्यक्तीने माझ्यासोबत फोटो काढण्याची मागणी केली तर मी त्याला नाही म्हणू शकत नाही आणि ती व्यक्ती गुन्हेगारी वृत्तीची आहे हे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लिहिलेले नसते त्यामुळे एखाद्या व्यक्तीने माझ्यासोबत फोटो काढल्यानंतर जर ती व्यक्ती गुन्हेगारी वृत्तीची असल्याचे दिसून आले तर त्याचा गैर अर्थ काढून खोटे आरोप करणे चुकीचे आहे असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार आशुतोष काळे यांनी स्पष्ट केले.
तसेच ज्यांच्याकडे पद आहे आणि ज्यांच्याकडे पद नाही अशा सगळ्यांना कायदा सारखाच आहे. चौकशीमध्ये सर्वकाही निष्पन्न होणार आहे. आरोपीच्या जबाबात माझ्या ऑफिसच्या लोकांवर आरोप लावले असतील तपासामध्ये जर कुठली गोष्ट त्या ठिकाणी आढळली तर कारवाई होईलच मात्र विरोधकांनी त्यात राजकारण आणू नये असे त्यांनी या शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे मात्र आज त्यांच्याकडे विकासावर बोलायला काही राहिलेच नाही त्यामुळे अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करून नागरीकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येत आहे मात्र नागरिकांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
नागिरकांनी मला संधी दिली होती मी त्या संधीचे सोने करून शहराचा जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रत्यन केला. शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला. रस्ते, शासकीय इमारती, पोलीस स्टेशन व कर्मचारी वसाहत, न्यायालय, उपजिल्हा रुग्णालय व्यापारी संकुल, नगरपालिकेची इमारत अशी महत्वपूर्ण विविध कामे या पाच वर्षांमध्ये पूर्ण झाली आहे असेही ते म्हणाले.
NCP Symbol Case : विधानसभेपूर्वी अजित पवारांना धक्का, मिळणार नवीन चिन्ह?
शहराची बेरोजगारी कशी कमी करता येईल यासाठी त्यासाठी एमआयडीसी मंजूर करून आणलेली आहे. परंतू यावर विरोधक चर्चा न करता नागरीकांची दिशाभूल करण्याचा काम करत आहे मात्र जर चुकीच्या पद्धतीने बदनामी केल्यास दावा ठोकू असा इशारा या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार आशुतोष काळे विरोधकांना दिला.