Download App

हॉस्टेलमध्ये घुसून विद्यार्थीनीचा विनयभंग; सीसीटीव्ही अन् सुरक्षाही नाही, नागपूर गव्हर्नमेंट हॉस्टेलचं भयान वास्तव

Student molested नागपूरच्या सरकारी मुलींच्या वसतिगृहामध्ये घुसून एका अज्ञाताने एका विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Student molested after entering government hostel in Nagpur : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये महिला सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं असल्याचं पहायला मिळत आहे. कारण अनेक विद्यार्थीनी आणि महिला शाळा आणि ओळखीच्या ठिकाणी देखील सुरक्षित नसल्याचं दिसत आहे. अशीच एक घटना नागपूरमधून समोर आली आहे. नागपूरच्या सरकारी मुलींच्या वसतिगृहामध्ये घुसून एका अज्ञाताने एका विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

काय आहे नेमकी घटना?

राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सरकारी मुलींच्या वसतिगृहामध्ये घुसून एका अज्ञाताने एका विद्यार्थीनीचा विनयभंग केला आहे. विशेष म्हणजे ही घटना घडली त्याठिकणी साधे सीसीटिव्ही कॅमेरे देखील नव्हते. त्यामुळे या घटनेनंतर येथील विद्यार्थ्यींनीमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या वसतिगृहामध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था देखील अपुरी असल्याचं भयान वास्तव समोर आलं आहे.

मारकुटा सूरज चव्हाण पोलिसांनी शरण रातोरात जामीनही मंजूर; पडद्यामागे नेमकं काय घडलं?

ही घटना 22 जुलैच्या रात्री 3 वाजता घडली. ओबीसी प्रवर्गातील मुलींच्या या सरकारी वसतिगृहामध्ये आरोपींनी दाराची कडी उघडून खोलीत प्रवेश केला. विद्यार्थीनीचा विनयभंग करून तिचा मोबाईल घेऊन पळून गेला. या वसतिगृहातील या घटनेनंतर पालकांकडून प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. कारण या वसतिगृहामध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची काळजी घेतली गेलेली नाही. त्यांनी ना या वसतिगृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत, ना सुरक्षा व्यव्यस्था उपलब्ध आहे.

नितीन गडकरींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार घोषित; 1 ऑगस्ट रोजी दिला जाणार पुरस्कार

तसेच सरकारी वसतिगृहामध्ये असा धक्कादायक प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पालकांकडून प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे. या वसतिगृहात तब्बल 64 मुली राहत आहेत. त्यामुळे या घटनेनंतर येथील विद्यार्थ्यींनीमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पण त्यातील एका मुलीच्या धाडसानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

follow us