Download App

विधिमंडळाच्या लॉबीत हाणामारी, कारवाई करा अन् तुरुंगात टाका, सुधीर मुनगंटीवारांची मागणी

Sudhir Mungantiwar : सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप

  • Written By: Last Updated:

Sudhir Mungantiwar : सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु असून आज विधिमंडळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधिमंडळातील लॉबीमध्ये बाचाबाचीनंतर मारहाण झाली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष योग्य कारवाई करणार असल्याची माहिती दिली.

तर आता या प्रकरणात राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी देखील या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि आमदारांसोबत गंभीर गुन्ह्यांचे लोकांना विधिमंडळ परिसरात परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. मुनगंटीवार आज माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशाचं सत्कार केलेल्या सभागृहात अशी घटना घडते ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची चौकशी हक्कभंग समितीला दिली पाहिजे. ज्याने हे कृत्य केले त्यांना प्रत्येक अधिवेशनात तुरूंगात टाकले पाहिजे अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तसेच विधान भवनाच्या परिसरात अशा घटना घटने म्हणजे सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होतो. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करावी. सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि पासेस देताना याबाबतचा विचार करावा. आमदारांसोबत गंभीर गुन्ह्यांचे लोक यायलाच नाही पाहिजे. मुळात गंभीर गुन्ह्यांतील लोकांना निवडणूकीलाच उभं राहता येता कामा नये असा सरकारने कायदा करायला हवा अशी मागणी देखील भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना केली.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या परिसरात आमदार गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचले होते. यानंतर बुधवारी पडळकर आणि आव्हाड आमने- सामने आले असता दोन्हीकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली होती. यानंतर आमदार आव्हाड यांनी मला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचा आरोप केला होता.

महाराष्ट्र 20 टक्के कमिशनचे राज्य, मुख्यमंत्री साफसफाई करणार का? विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल 

तर आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या आवारात एकमेकांना भिडले. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

follow us