बातमी फेक, राजीनामा दिला नाही; प्रदेशाध्यक्षपदाबाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा

बातमी फेक, राजीनामा दिला नाही; प्रदेशाध्यक्षपदाबाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा

Jitendra Awhad On Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी शरद पवार (Sharad Pawar) कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 15 जुलैला पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. तर दुसरीकडे आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोठा केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत आव्हाड यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. तसेच पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो. असं देखील आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स वर म्हटले आहे की, मा. जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे , हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो. आव्हाड यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे जयंत पाटील यांच्यानंतर आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत 15 जुलैला रोजी घोषणा होणार असल्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जी माहिती तुम्हाला मिळाली आहे ती मला मिळाली नाही. पक्षाची एक पद्धत असते. पक्षाची बैठक होऊन त्याच्यात निर्णय घेतला जातो असं माध्यमांशी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच पक्षात कोणतीही नाराजी नाही, शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष होणार आहे हे तुमच्याकडून मला कळत आहे. पवार साहेब हे विश्वासात घेऊन बैठक घेऊन असे निर्णय घेत असतात. असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

… तर टायरात घालून मारा, दहा पिढ्या आठवल्या पाहिजे; बारामतीकरांना उपमुख्यमंत्री अजितदादांचा दम

तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्षपदासाठी अजून नाव निश्चित नाही शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. असं आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांना सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube