मुंबई : जागा वाटपाचा फॉर्म्युला टिव्ही चॅनेलच्या माध्यमातून ठरत नसल्याचं स्पष्टीकरण भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिलं आहे. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत भाष्य केलं होतं. त्यांच्या या भाष्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टीकरण दिलंय.
अनिक्षा जयसिंघानी प्रकरणी राज्य महिला आयोगाने दिलं स्पष्टीकरण…
मंत्री मुनंगंटीवार म्हणाले, अद्याप निवडणुकीसाठी एक वर्ष बाकी आहे. जागावाटपाचा फॉर्म्यूला केंद्रीय मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतर ठरणार आहे. हा फॉर्म्युला जाहीर सभा किंवा पत्रकार परिषदेत ठरत असेल तर कुठेही पोषक वातावरण नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
तसेच जागावाटपासाठी कोणतंही सुत्र हे तर्कसंगत आपल्याला ठरवावं लागतं. ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील, अन् ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून येणार असतील त्या ठिकाणीच ज्या त्या पक्षाला जागा मिळाल्याचं पाहिजेत असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
तुम्हाला सत्ता हवी, मंत्री व्हायचे आहे पण काम करायचे नाही; अजितदादांनी सुनावले
ही विधाने पत्रकारांनी विचारल्यानंतर सहजपणे राजकीय नेते बोलून जातात त्यामुळे ते एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नसून 288 जागांचा अभ्यास करुन हे तिन्ही नेते जो आदेश देतील तो आदेश आम्हाला मान्य असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
दरम्यान, निवडणुकीला एक वर्ष बाकी असून निवडणुकीमधील जागांचा फॉर्म्यूला माईक, टिव्ही चॅनेलवरुन कधीच ठरत नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंयं.
लष्करे खून प्रकरणी पाच जणांची जन्मठेप कायम !
काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकरांनी फॉर्मूला ठरल्याचं सांगत लोकसभेसाठी 22 तर विधानसभेसाठी 126 जागा मिळणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय.