लष्करे खून प्रकरणी पाच जणांची जन्मठेप कायम !
अहमदनगर : अण्णा लष्करे हत्याच्या गुन्ह्यामधील आरोपींनी छञपती संभाजीनगरच्या खंडपीठात दाखल केलेल्या चार अपिलांची एकत्रित सुनावणी घेवून राजू जहागिरदारसह सहा पैकी पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय यांनी दिलेली सश्रम कारावास व जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवत एका आरोपीची निर्दोष मुक्त केली.
याबाबत माहिती अशी की,सुनील उर्फ अण्णा लष्करे यांच्या १८ मे २०११ रोजी झालेल्या हत्याच्या गुन्ह्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांनी सेशन केस क्रमांक ३७६/२०११ या केसमध्ये आरोपी १)राजू गुलाब शेख उर्फ राजू जहागीरदार २) सय्यद सरफराज अब्दुल कादर,३) शेख एजाज उर्फ मुन्ना जहागीरदार ४) शेख जावेद उर्फ पेंटर ५) मुनीर उर्फ मुन्ना पठाण तसेच ६) शेख मुस्ताक अहमद गुलाम रसूल या सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
त्यावर नाराज होऊन वरील आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या छञपती संभाजीनगर यांच्याकडे अपील दाखल केलेले होते. त्यामध्ये उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील न्यायमूर्ती आर. जी. अवचट व आर. एम. जोशी यांच्या पीठाने सदर चारही अपील प्रकरणाची एकत्रित सुनावणी घेऊन एकत्रित निकाल दिला. त्यामध्ये सहापैकी पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय यांनी दिलेली सश्रम कारावास व जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवत एका आरोपीला निर्दोष मुक्त केले.
यामध्ये या अगोदर १०/१०/२०१४ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांनी वरील सहा आरोपींना सश्रम कारावास व जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी कटामागचा सूत्रधार शेख राजू गुलाब उर्फ राजू जहागीरदार यास उच्च न्यायालयाने काही दिवसापूर्वी जामीन मंजूर केलेला होता. त्यामुळे तो सध्या जामीनावर होता. त्यास उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर तात्काळ हजर होण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून जामीनवर वर असलेला आरोपी राजू जहागीरदार यालाही आता जेलमध्ये जावे लागणार आहे.
उच्च न्यायालयाने जिल्हा व सत्र न्यायालयातील दिलेल्या साक्ष व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पूजा लष्करे व मनोज धोत्रे यांचे १६४ प्रमाणे नोंदविलेली साक्ष तसेच सरकारी पंच, ओळख परेड, पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, डॉक्टरांची साक्ष तसेच न्याय वैज्ञानिक तपासणी अहवाल (फॉरेन्सिक रिपोर्ट) मोबाईल टावर लोकेशन, कॉल डिटेल्स व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकालांचे निवाडे यांच्या आधारे सहापैकी पाच आरोपींना सत्र न्यायालयाने दिलेली सश्रम कारावास व जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.
मुख्यमंत्री म्हणाले… म्हणून श्रीमंतांच्या यादीत माझे नाव येणार नाही, मात्र…
तर शेख मुस्ताक अहमद गुलाम रसूल याला ओळख परेडच्या वेळी हजर का करण्यात आले नाही याचे सबळ कारण न दिल्यामुळे व साक्षीदार क्रमांक 19 मनोज धोत्रे यांनी इतर तीनच आरोपी ओळख परेड मध्ये होते व घटनास्थळी होते असे ओळखणारी साक्षी दिल्याने सबळ पुरावे अभावी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.