आ देखे जरा किसमे…सुषमा अंधारेंचं बावनकुळेंना खुलं चॅलेंज…

ठाणे : चंद्रशेखर बावनकुळे तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही 48 तासांत मातोश्रीवर या, असं खुलं चॅलेंजच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी दिलं आहे. सुषमा अंधारे यांची तोफ आज ठाण्यातल्या ठाकरे गटाच्या महामोर्चात धडाडली. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांच्या धुमशाच पाडला आहे. एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? गौतमी पाटीलचं भन्नाट उत्तर; म्हणाली, ‘…मार खाणार’ सुषमा अंधारे म्हणाल्या, […]

Sushma Andhare

Sushma Andhare

ठाणे : चंद्रशेखर बावनकुळे तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही 48 तासांत मातोश्रीवर या, असं खुलं चॅलेंजच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी दिलं आहे. सुषमा अंधारे यांची तोफ आज ठाण्यातल्या ठाकरे गटाच्या महामोर्चात धडाडली. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांच्या धुमशाच पाडला आहे.

एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? गौतमी पाटीलचं भन्नाट उत्तर; म्हणाली, ‘…मार खाणार’

सुषमा अंधारे म्हणाल्या, महाराष्ट्रात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी ताकद आहे. महाराष्ट्राची भाजप तुमचं ऐकते. तर माझं बावनकुळेंना खुलं चॅलेंज आहे, तुमच्यात हिंमत असेल तर पुढील 48 तासांत मातोश्रीवर या, “आ देखे जरा किसमे कितना है दम” असं चॅलेंज त्यांनी यावेळी दिलंय.

…म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्या, अमित शाह यांच्याकडे खासदारांची मागणी

तसेच भाजपमध्ये जर चंद्रशेखर बावनकुळेंची एवढी ताकद आहे, तर मग 2019 साली विधानसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी का कापलं? असा खोचक सवाल उपस्थित करीत अंधारेंनी बावनकुळेंवर निशाणा साधला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा, आता ‘सततचा पाऊस’ आता नैसर्गिक आपत्ती समजली जाणार, मंत्रिमंडळाचा निर्णय

ठाण्यात काल रोशनी शिंदे नामक महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. त्यानंतर या कार्यकर्त्याची भेट स्वत: उद्धव ठाकरेंनी घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी फडणवीसांना फडतूस असं म्हंटल.

त्यावर प्रत्युत्तर देत चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंनी घराबाहेर फिरु देणार नसल्याचा इशारा दिला होता. याबाबत पत्रकच बावनकुळेंनी प्रसिद्ध केलं होतं. त्यावर आता सुषमा अंधारेंनी बावनकुळेंना टार्गेट करत चांगलंच धुतलंय.

Exit mobile version