…म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्या, अमित शाह यांच्याकडे खासदारांची मागणी

  • Written By: Published:
…म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्या, अमित शाह यांच्याकडे खासदारांची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात ठाकरे गटाच्‍या कार्यकर्ती रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्‍ला प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेतला जावा अथवा त्यांना पदावरुन हटविले जावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेऊन केली आहे.

ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्याकडे ही मागणी केली आहे. यावेळी त्यांनी राज्यात घडत असलेल्या घटनांची माहिती अमित शाह यांना दिली. यावेळी राज्यात घडत असलेल्या घटनांचा अहवाल मागवावा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

ठाकरे फडतूस, दगाबाज माणूस, केंद्रीय मंत्री राणेंनीही ठाकरेंना सोडलं नाही

देवेंद्र फडणवीस अपयशी

यावेळी अमित शाह यांच्याशी भेट झाल्यानंतर चतुर्वेदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले असल्याची टीका केली. त्या म्हणाल्या की संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीत कशी हिंसा झाली ते सर्वांनी पाहिले. आता ठाण्यात रोशनी शिंदेंना मारहाण झाली. हा गुन्हा दाखल न करता आता पोलिसच पीडितेच्या मागे लागलेत. हा कोणता कायदा आणि न्याय आहे.

त्या पुढे म्हणाल्या की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे. ते प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. ते गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेत. त्यांना पदावरून हटवण्याची गरज आहे. असं म्हणत त्यांनी फडणसवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Fadnavis Vs Thackeray : ‘फडतूस’ शब्दांचा अर्थ राऊतांनी सांगितला, पण खरा अर्थ काय?

दरम्यान शिवसेना (ठाकरे गट) नेत्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी आयोजित निषेध मोर्चाला आणि सभेला अखेर ठाणे पोलिसांकडून (Thane Police) परवानगी देण्यात आली आहे. रोशनी शिंदे प्रकरणात पोलिसांनी पक्षपातीपणा केला असा आरोप ठाकरे गटानं केला आहे आणि त्याचा निषेध म्हणून शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube