Sujay Vikhe Patil on NCP Political Crises : एकनाथ शिंदेंनंतर काल (दि. 2) विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांच्या देखील यावर प्रतिक्रिया येत आहेत. त्यामध्ये भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. ( Sujay Vikhe Patil Criticize Sanjay Raut on NCP Political Crises )
‘Namak Halal’ फेम अभिनेता हरिश मॅगन यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन
काय म्हणाले खासदार सुजय विखे पाटील ?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला… अजित पवार भाजप सोबत गेल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांची गोची झाली आहे त्यातल्या त्यात नेहमीच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपवर टीका करणारे संजय राऊत यांच्या भूमिकेबाबत भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना विचारले असता…संजय राऊत यांनी आतापर्यंत शिवसेना पक्ष फोडण्यासाठी मदत केली, आता राष्ट्रवादीसाठी फोडण्यासाठी मदत केली “अब काँग्रेस की बारी है।” असं सुजय विखेंनी म्हटलं आहे…आता काँग्रेस फोडण्यासाठी त्यांनी अशीच मदत करावी असं सुजय विखेंनी म्हणत संजय राऊत यांना टोला लगावला.
शिंदेंचे मुख्यमंत्रीपद धोक्यात? अजितदादांना भाजपचा शब्द; पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याने खळबळ
पुढे सुजय विखे असं देखील म्हणाले की, या अजित पवारांच्या बंडाविषया तसेच त्यांच्या शपथ विधीविषयी जे काही घडलं ते आम्हाला काही माहिती नव्हतं. आमच्या नियोजित कार्यक्रमात त्यामुळे कोणताही बदल झालेला नाही. जो काही निर्णय झाला तो वरच्या पातळीवर झाला. मात्र जो काही निर्णय आमचे वरिष्ठ घेतात त्यानुसार काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे या निर्णयाचं स्वागतआहे. तसेच सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच मदत होईल असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.