Download App

‘मी गेलेल्या एका लग्नात नवरीच पळून गेली…’ सुजय विखेंनी केली अजित पवारांची पाठराखण

Sujay Vikhe Patil On Ajit Pawar Wedding Attended Bride : हुंड्याच्या हव्यासापोटी वैष्णवी हगवणे नावाच्या तरूणीचा बळी गेलाय. वैष्णवीच्या मृत्यूनंतर ( Vaishnavi Hagawane Case) हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजतंय. कारण वैष्णवीचा तिचे सासरे राजेंद्र हगवणे, नवरा शशांक हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांच्याकडून छळ करण्यात आला होता. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar) नेते होते. हगवणे कुटुंबातील पाच सदस्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

वैष्णवी हगवणेच्या लग्नामध्ये अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती, यावरून अजित पवार यांच्यावर चौफेर टीका होतेय. यावर आता माजी खासदार सुजय विखे यांनी (Sujay Vikhe) वक्तव्य केलंय.

पुण्यात विविहितेंच्या आत्महत्येचे सत्र सुरूच; सासरच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेने केले विषप्राशन

सुजय विखे यांनी म्हटलंय की, अजित पवार एक होतकरू नेतृत्व असून आम्ही अनेक लग्नांमध्ये भेटी देतो. त्यात अनेक संसारांबाबत वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. मी गेलेल्या एका लग्नातील नवरीच पळून गेली (Maharashtra Politics) होती. मग काय करायच? अशा प्रकरणांमध्ये राजकीय व्यक्तींना आणलं नाही गेलं पाहिजे. राजेंद्र हगवणे यांना या प्रकरणापूर्वी कोणीही ओळखत नव्हतं. परंतु, आज त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे.

हगवणेंना त्यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा मिळाली पाहिजे. परंतु राजकीय व्यक्तींना अशा प्रकरणांमध्ये ओढू नये, असं देखील सुजय विखे म्हटलंय. आमच्यासोबत सुद्धा अनेकजण फोटो काढतात. मग नंतर काहीजण म्हणतात की, तो वाळू तस्कर आहे. आरोपी होता. जर हे सगळं टाळायचं असेल तर कायदाच करावा लागेल. प्रत्येक आरोपीच्या कपड्यांवर बिल्ला लावण्याची वेळ येईल, असंही सुजय विखे यांनी म्हटलंय.

प्राइम व्हिडिओने केली सर्वात मोठ्या भारतीय रिअॅलिटी शोची घोषणा, द ट्रेटर्सचं सुत्रसंचालन करणार करण जौहर

तर केवळ लग्नाला गेल्यामुळं अजितदादांना काही लोकं टार्गेट करीत आहे. जे सध्या बोलत आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असतील, तर त्यांना लग्नाच्या पत्रिकाच येत नाहीत. कारण ज्यांना पत्रिका येतात, त्यांनाच असा त्रास होतो. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांना देखील पत्रिका द्यायला सुरूवात करा, असा टोला सुजय विखे यांनी लगावला आहे.

 

follow us