Sujay Vikhe Patil : अहमदनगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी विठ्ठला कृपा कर आणि राज्य दुष्काळमुक्त होवू दे आशी प्रार्थना पांडूरंगाच्या चरणी केली आहे. नगर जिल्ह्यातून पंढरपूर (Pandharpur) येथे गेलेल्या दिंड्यामध्ये सहभाग घेवून डॉ. सुजय विखे यांनी वारकर्या समवेत विठूनामाचा जयघोष केला.
आषाढी वारीच्या निमिताने डॉ. सुजय विखे पाटील यांनी पंढरपूर येथे पांडूरंगाचे दर्शन घेतले. त्यापूर्वी विखे यांनी नगरसह राज्यातून आलेल्या दिंड्यामध्ये पायी चालून भक्तीमय वातावरणाचा आनंद घेतला.
तसेच अहमदनगर जिल्ह्यातून पंढरपूरमध्ये आलेल्या सर्व वारकर्याशी त्यांनी संवाद साधला आणि येथील सोयी सुविधांबाबत माहिती घेतली. तसेच विखे पाटील परीवारच्या वतीने पंढरपूरमध्ये विकसित करण्यात आलेल्या आश्रमात उतरलेल्या वारकऱ्यांची देखील त्यांनी भेट घेतली.
छगन भुजबळांशी काय चर्चा झाली, शरद पवारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
याच बरोबर राज्यात चांगला पाऊस होवू दे आणि राज्यातील दुष्काळ हटू दे आशी प्रार्थना पांडूरंगाच्या चरणी सुजय विखे यांनी केली. तसेच आषाढ वारीच्या अध्यात्मिक सांस्कृतिक सोहळ्याच्या सुजय विखे यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.
पिंपरी- चिंचवडमध्ये राजकीय भूकंप, अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात 24 जणांचा प्रवेश