Sujay Vikhe : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. यातच अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी जर पक्षाने आदेश दिला तर संगमनेरमधूनच विधानसभा (Sangamner Constituency) लढवायला आवडेल असे प्रतिपादन केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसापूर्वी देखील माध्यमांशी बोलताना सुजय विखे यांनी जर पक्षाने आदेश दिला तर राहुरी किंवा संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते. तर आज पुन्हा एकदा त्यांनी संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) विरुद्ध सुजय विखे अशी लढत पाहायला मिळणार का? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून पराभव झाला होता.
नेमकं काय म्हणाले सुजय विखे
माध्यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले की, मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल, इतर मतदारसंघात नको, जर पक्षाने मला आदेश दिला तर मी संगमनेर मधूनच उमेदवारी करणार. मी संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असं माजी खासदार सुजय विखे म्हणाले.
दहशतवादाला खोलवर गाडून टाकू अन्…, अमित शहांचा काश्मीरमध्ये शब्द
तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लबोल केला. घरी बसलेल्या माणसाला वाटतं की सगळ्यांनीच घरी बसावं ते आज विश्रांती घेत आहेत. त्यांना पुन्हा पाच वर्षे विश्रांती देऊ, असा टोला उद्धव ठाकरेंना सुजय विखे यांनी लावला. महायुती सरकारला घरी बसवा असे वक्तव्य उध्दव ठाकरे यांनी केले होते.