बाळासाहेब थोरातांविरोधात थेट ‘अमित शाहंचा’ प्लॅन… गुजरातचे दोन ट्रबल शूटर संगमनेरमध्ये

बाळासाहेब थोरातांविरोधात थेट ‘अमित शाहंचा’ प्लॅन… गुजरातचे दोन ट्रबल शूटर संगमनेरमध्ये

संगमनेर तालुका आणि थोरात कुटुंबिय हे गत चार दशकांपासूनचे समीकरण. माजी आमदार भाऊसाहेब थोरात (Bhausaheb Thorat) यांचा राजकीय वारसा घेऊन बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) राजकारणात आले. आज घडीला ते सलग आठव्यांदा निवडून आले आहेत. राज्यातील सर्वात जेष्ठ आमदार आहेत, विधिमंडळाचे गटनेते आहेत. विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे पानीपत करण्यात थोरात यांची भूमिका महत्वाची होती. नुकतीच केंद्रीय नेतृत्वाने थोरात यांची अखिल भारतीय काँग्रेस (Congress) कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे. संगमनेरमध्येही यंदा भावी मुख्यमंत्र्याला मतदान करायचे, हे स्पिरिट रुजविले जात आहे. कदाचित याचमुळे थोरात यांचा बालेकिल्ल्यातच पाडाव करण्यासाठी, त्यांना संगमनेरमध्येच अडकून ठेवण्याची रणनीती भाजपकडून (BJP) आखण्यात आली आहे. आणि या रणनीतीचे मास्टरमाईंड आहेत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)

नेमकी काय आहे ही रणनीती? आणि थोरात यांना घेरण्यासाठी अमित शाहंनी कसे संगमनेरमध्ये लक्ष घातले आहे? पाहुया या..

1985 च्या निवडणुकीत काँग्रेसने तिकीट नाकारल्याने बाळासाहेब थोरात अपक्ष रिंगणात उतरले आणि निवडूनही आले. आमदार होताच थोरात पुन्हा काँग्रेसच्या मूळ प्रवाहात आले. त्यानंतरच्या सातही निवडणुका त्यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या. थोरात यांचा जेवढा पगडा विधानसभेवर आहेत, तेवढीत स्थानिक राजकारणावरही पकड आहे. मतदारसंघातील साखर कारखाना, दूध संघासह झाडून सगळ्या सहकारी संस्था, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायती या थोरात यांच्या ताब्यात आहेत. या संस्थांच्या माध्यमातून संगमनेरचे अर्थकारण मजबूत झाले, कार्यकर्त्यांची भक्कम फळी त्यांनी उभी केली. थोरात यांच्या याच बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रणनीती तयार केली आहे.

Video : वस्तादाला राखून ठेवलेला डाव खेळण्याची वेळ आणू नका; अजितदादांनी सावध केलं

अमित शाह सध्या स्वतः संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहेत. शाह यांनी त्यांच्या विश्वासातील गुजरामधील आमदार आणि मंत्र्यांची टीम अहमदनगरमध्ये उतरवली आहे. त्यांचे काम देखील प्रत्यक्ष सुरू झाले आहे. या रणनीतीच्या बैठकीसाठी गुजरातहून काही आमदार नाशिकला आले होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीवर विचार मंथन झाले. त्यानंतर अहमदनगरमधील 12 मतदारसंघात ही टीम रवाना झाली. यात गुजरातचे भाजपचे दोन ट्रबल शूटर आमदार संगमनेरमध्ये दाखल झाले आहेत. या आमदारांनी आज स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कामाला सुरुवात केली.

गुजरातचे आमदार जगदीश मकवाना आणि किशोरीलाल बेनीवाल हे कालपासून संगमनेर मतदारसंघात काम करीत आहेत. पुढील दोन महिने निवडणूक होईपर्यंत ते येथे तळ ठोकणार आहेत. गुजरात मधील निवडणुकीचा दीर्घ अनुभव असलेले हे आमदार राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या योजना समाजाच्या दृष्टीने किती हिताच्या आहेत. त्यातून भविष्यात मतदारांचा कसा विकास होईल, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येणे किती आवश्यक आहे, हे प्रत्येक कार्यकर्त्यांवर बिंबविण्याचे काम करणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांनंतर विशेष नियोजन केले जाणार आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपची संघटनात्मक यंत्रणा सक्रिय करण्यावर त्यांचा भर असणार आहे.

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचा तपास CBI कडे वर्ग, मुंबई उच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक…

आता प्रश्न राहतो तो अमित शाह यांच्या रणनीतीमध्ये उमेदवार कोण असणार? भाजप-शिवसेनेच्या युतीत 1990 सालचा अपवाद वगळता संगमनेर कायमच शिवसेनेकडे राहिला. मात्र सेनेला आजवर एकदाही थोरातांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करता आलेला नाही. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा 62 हजार मतांनी पराभव झाला होता. त्यांच्या विरोधात आमदार थोरात यांना 1.25 लाख मते मिळाली होती. त्यामुळे यंदा मतदारसंघ भाजपला सुटून माजी खासदार सुजय विखे पाटील उमेदवार असू शकतात अशी चर्चा आहे. त्यांनीही स्वतः आपण विधानसभेसाठी इच्छुक असून संगमनेरमधून तयारी करतोय असे सांगितले आहे. यंदा काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांच्याऐवजी कन्या कॅन्सर तज्ञ डॉ जयश्री थोरात-देशमुख यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जात होते. मात्र या सगळ्या घडामोडी बघता आता स्वतः थोरातच रिंगणात उतरणार की मुलीला उमेदवारी देणार? हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube