Sujay Vikhe sensational allegations on Rohit Pawar about contractors of Jaljeevan Sceam : अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन योजनांच्या कामांबाबत रोज नवनवीन खुलासे उघडकीस येत आहे. अनेक गावातील जल जीवन योजनेची कामे केवळ कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखविले परंतु प्रत्यक्षात मात्र वास्तवात काहीच झालेचे केंद्रीय पथकाच्या निदर्शनास आले आहे. तर या कामातील ठेकेदार हे रोहित पवार व लंके यांचे लागेबांधे असलेल्या व्यक्तींकडे असल्याचा धक्कादायक खुलासा माजी खासदार सुजय विखे यांनी केला आहे.
खा. लंकेंची चौकशीची मागणी अन् केंद्रीय पथक अहिल्यानगरात दाखल –
राष्ट्रीय पेयजल व जलजीवन योजनेतून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात काम सूरु आहे. यातील काही गावांमधील जलजीवनचे कामे केवळ कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखविले मात्र वास्तविक जागेवर कामच नसल्याने या कामांची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केली होती. त्यानुसार जिल्ह्यामध्ये केंद्रीय पथकाने कामाची चौकशी देखील सूरु केली आहे.
कर्जत जामखेडमधील जलजीवनची कामे रोहित पवारांच्या निकटवर्तीयांकडे –
जल जीवनच्या गैरकारभारावर बोलताना माजी खासदार सुजय विखे यांनी रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. जलजीवनचे सर्व कामे ठेकेदारांच्या नेमणूकीपर्यत हे आघाडी सरकारच्या काळात झालेले आहे. कर्जत जामखेड मध्ये सर्व ठेकेदार हे रोहित पवारांचे लागेबंधे असलेले ठेकेदार आहे तर पारनेर मध्ये देखील तत्कालीन आमदार यांचे तेथे ठेकेदार आहे. मात्र आता सरकार बदलल्यामुळे त्यांचं नुकसान झाल्याने हे सर्व गोष्टी उभारल्या जातं आहे. खरंतर वर्क ऑडर निघाल्यानंतर सरकार बदलल्याने यांनी वसविलेल्या लोकांकडून काम करवून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली असल्याची टीका सुजय विखे यांनी केली आहे.
ठाकरेंना धक्का, माजी आमदार संजय घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश
केंद्रीय समितीच्या पाहणीत धक्कादायक खुलासे –
खासदार लंके यांच्या मागणीनंतर केंद्रीय जलशक्ती विभागाने एक केंद्रीय समिती अहिल्यानगर मध्ये जलजीवांच्या कामांच्या पाहणी करिता पाठवले. केंद्रीय समितीच्या पाहणीत अनेक धक्कादायक खुलासे उघडकीस आले असून पारनेर पाथर्डी यांसारख्या तालुक्यांमध्ये तर केवळ कागदोपत्री योजना पूर्ण झाल्याचे दाखवले असून काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे आढळून आले. तर अनेक गावातील पाण्याची पाईपलाईन ही केवळ अर्धा ते दीड फुटांवरच टाकण्यात आल्याचे दिसून आले आहे. जी कामे झाले आहेत त्या कामांच्या बिलांमध्ये देखील मोठा व्यवहार झाल्याचा ग्रामस्थांनी समिती समोरच तक्रारी मांडल्या.