Sujay Vikhe : राहुरी श्रीरामपुरात भाजपचे वारे; विखेंच ठरतील किंगमेकर…

Sujay Vikhe : राज्यात नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी आता २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नगर जिल्ह्यातील काही

Sujay Vikhe

Sujay Vikhe

Sujay Vikhe : राज्यात नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी आता 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नगर जिल्ह्यातील काही मतदारसंघामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये प्रामुख्याने पहिले तर राहुरी व श्रीरामपूर या दोन मतदारसंघामध्ये अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तनपुरेंचा बालेकिल्ला असलेल्या राहुरीमध्ये मात्र बदलाचे वारे वाहू लागले आहे. नागरी समस्यांनी वैतागलेल्या नागरिकांना मतदारसंघात बदल हवा असून यामुळे राहुरीमध्ये भाजपसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

तर दुसरीकडे आरक्षित मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूरचा (Shrirampur) विकास देखील खुंटला असल्याने याठिकाणी माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी राजकीय डाव टाकत काँग्रेसला खिंडीत गाठले आहे. यामुळे आता राहुरीसह श्रीरामपुरात विखेंच किंगमेकर ठरतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

श्रीरामपूरच्या विकासकामांसाठी विखेंचा पुढारकर

श्रीरामपूर शहरातील रस्ते, पाणी, यासंह असलेल्या नागरी समस्यांभोवती नगर परिषदेची निवडणूक ही पार पडणार आहे. यामुळे आता विकासकामांवरच निवडणूक लढवल्या जाणार असून नुकतेच शहराच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भरीव निधी शहराला दिला आहे.

विविध विकास कामांसाठी विखे यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात विकास निधी शहराच्या विकासासाठी मिळालेला आहे. यामुळे शहरासह मतदार संघाच्या विकासासाठी देखील निधी कमी पडू देणार नाही अशी गवाही मंत्री विखे यांनी दिली. यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील मंत्री विखे यांच्यासह माजी खासदार सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा वरचषमा राहणार असे पूरक चित्र मतदार संघात पाहायला मिळते आहे.

भाऊ म्हणून घरात आणलं, महिलेचा तरुणावर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक प्रकार

नागरीसमस्यांचा विळखा… राहुरीमध्ये विखे कर्डीले डाव टाकणार

राहुरी नगरपरिषदेवर गेली अनेक वर्षे तनपुरे गटाची सत्ता राहिली आहे. मात्र यंदाची निवडणुक तनपुरे गटाला जड जाण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राहुरीमध्ये माजी खासदार सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली कमल फुललं व भाजपने विजयाचा गुलाल उधळवला. तनपुरे यांच्या नेतृत्वाला राहुरीकरांनी नाकारले. आता त्यानंतर होणाऱ्या नगरपरिषदेच्या निडणुकीमध्ये देखील सुजय विखे यांच्यासह कर्डीले गटाने तनपुरेंना धोबीपछाड देण्यासाठी राजकीय डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. शहरातील नागरी समस्यांचा मुद्दा हाती घेत विखे यांनी तनपुरे गटावर निशाणा साधला. तसेच केंद्रात व राज्यात महायुतीची सत्ता असल्याने स्थानिक पातळीवर देखील भाजपला पोषक वातावरण असल्याचे पाहायला मिळते आहे.

Exit mobile version