Download App

तुमच्या उमेदवारीसाठी मीच आग्रही, अजितदादांच्या कृपेने निवडून आलेल्यांनी मला सांगू नये; तटकरेंचं कोल्हेंना प्रत्युत्तर

Sunil Tatkare : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे ( Sunil Tatkare ) यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांना जोरदार प्रत्युत्तर दिल. तटकरे म्हणाले गेल्या पाच वर्षात एका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या कृपेने निवडून आलेल्यांनी मला सांगण्याची आवश्यकता नाही.

‘आमच्यात फाटलंय’ पण ताईंचं वेगळंच उत्तर; ‘पक्ष अन् कुटुंबात फुट नाहीच’…

खासदार अमोल कोल्हे यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पण याचा अर्थ असा नाही की, माझी कामगिरी कमी आहे. असं त्यांनी मानावं. त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, मी पाच वेळा विधानसभेवर निवडून आलोय. सध्या लोकसभेवर आहे, 2014 ला ही माझा निसटता पराभव झाला होता. त्यामुळे मला संसद रत्न पुरस्कार मिळाला नाही म्हणजे याचा अर्थ मी मतदार संघात काही काम करत नाही किंवा मी संसदेमध्ये भाषण केलं नाही असा होत नाही.

अमित शाहांच्या उपस्थितीत रणनीती ठरली! भाजप छत्रपती संभाजीनगरची जागा लढणवणार?

त्यामुळे कोल्हे जर असा आरोप करत असतील तर तो त्यांच्या अभिनयाचा भाग आहे का? हे मला तपासून घ्यावे लागेल. उलट गेल्या पाच वर्षांमध्ये संसदेमध्ये अमोल कोल्हे यांना प्रोत्साहित करण्याचे काम मी केले. हे त्यांनी विसरू नये. तसेच त्यांना उमेदवारी मिळावी. यासाठी सुद्धा मी आग्रह धरला होता. स्वतःबद्दल अवश्य बोला, पण माझ्या कामगिरीबद्दल लोकांमधील माझे 40 वर्षाची कामगिरी. गेल्या पाच वर्षात एका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या कृपेने निवडून आलेल्यांनी मला सांगण्याची आवश्यकता नाही. एवढाच मित्रत्वाचा सल्ला मला त्यांना द्यायचाय. असं प्रत्युत्तर तटकरे यांनी कोल्हे यांना दिलं आहे.

काय म्हणाले होते अमोल कोल्हे?

अजित पवार यांच्या सेलिब्रेटी उमेदवाराच्या टीकेला उत्तर देताना, अमोल कोल्हे यांनी म्हटले होते की, अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे हे देखील खासदार आहेत. पण लोकसभेतील माझी कामगिरी त्यांच्यापेक्षा चांगली आहे. शरद पवार यांनी मला दिलेल्या संधीशी प्रामाणिक राहण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी संसदेतील माझी कामगिरी लोकांसमोर ठेवली आहे. मी जी भूमिका बजावली आहे त्यावर मी ठाम आहे आणि यापुढेही असेच म्हणतो. असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले.

follow us