Download App

हे माझ्या काकींचं घर; अजितदादांवर प्रश्न विचारताच सुळेंनी ठणकावून सांगितलं

पहिल्यांदाच बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार अशी लढत पाहण्यास मिळत असून, सुनेत्रा पवारांनी विकासाच्या तर, शरद पवारांकडून भावनिकतेचा मुद्दा उपस्थित करत मतदन करण्याचे आवाहन मतदारांना केल्याचे प्रचारादरम्यान पाहण्यास मिळाले होते.

  • Written By: Last Updated:

बारामती : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुप्रिया सुळे (Supria Sule) यांनी अचानक अजित पवारांच्या (Ajit Pawar) घरी मोर्चा वळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता या भेटीवर स्वतः सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिले असून, अजितदादांची भेट घेतली का? यावर उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या काटेवाडीतील घर हे माझ्या काकींचं असून, मी फक्त आणि फक्त आशाकाकींटी भेट घेण्यासाठी आले होते. माझे लहानपण काकूकडेच गेलं आहे. माझ्या आईनं जेवढं केलं नसेल तेवढं आशा काकींनी केलं आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत असून, त्यांच्या अचानक भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता यावर भेटीवर सुळेंनी स्पष्टीकरण दिले आहे. (Supria Sule On Ajit Pawar Katewadi Home Visit)

Ajit Pawar आताच मिशा काढा, 4 जूननंतर तर..; भाऊ श्रीनिवास पवारांचा खोचक सल्ला

पवार कुटुंबियांना बजावला मतदानाचा हक्क

यावेळी पहिल्यांदाच बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार अशी लढत पाहण्यास मिळत असून, सुनेत्रा पवारांनी विकासाच्या तर, शरद पवारांकडून भावनिकतेचा मुद्दा उपस्थित करत मतदन करण्याचे आवाहन मतदारांना केल्याचे प्रचारादरम्यान पाहण्यास मिळाले होते. आज बारामतीत मतदान पार पडत असून, सकाळी सकाळी पवार कुटुंबियांनी बारामतीतील विविध मतदार केंद्रांवर जात मतदानाचा हक्क बजावला होता. यात अजित पवार, सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांच्यासह शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मतदान केल्याचे दिसून आले. त्यानंतर मात्र अचानक सुप्रिया सुळे काटेवाडीतील अजितदादांच्या घरी दाखल झाल्यामुळे बारामतीच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

हे माझ्या काकीचं घर…

अजितदादांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, काटेवाडीतील घर हे माझ्या काका काकींचं आहे. मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी अजितदादांची भेट झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला असता मी फक्त काकींटची भेट घेण्यासाठी आले होते असे स्पष्ट केले. यावेळी सुप्रिया सुळेंनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींनादेखील उजाळा दिला.

बारामतीत पैशांचा पाऊस, विरोधकांकडून मतदारांना पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप; रोहित पवारांचा गंभीर आरोप

सुळे आशाताई भेट म्हणजे इमोश्नल टॅक्टिक्स 

सुप्रिया सुळे अचानक अजितदादांच्या घरी भेटायला गेल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेले असतानाच यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सुप्रिया सुळे आणि आशाताई पवार यांची भेट हा भावनिक रणनीतीचा भाग असून, ही भेट म्हणजे इमोश्नल टॅक्टिक्सचा भाग असल्याचे म्हटले आहे.

निवडणुकीमध्ये काही भावनिक रणनीती असतात त्यापैकीच हा एक भाग आहे. मात्र, आपण यावर काही टिपण्णी करणार नाही कारण अजितदादा आणि सुप्रिया सुळे एकमेकांचे भाऊ-बहिण आहेत राजकीय विरोधकच आहेत शत्रू तर नाहीयेत. त्यामुळे का गेले का नाही गेले हे आपल्याला नंतर समजेल असे फडणवीस म्हणाले.

सुप्रिया सुळेंचं एक मत वाढणार : शरद पवार 10 वर्षांनंतर पुन्हा झाले बारामतीचे मतदार

मेरी माँ मेरे साथ है!, अजितदादांचं योग्य उत्तर

सकाळी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अजितदादांनी मेरी माँ मेरे साथ है! असे विधान केले. यावरही फडणवीसांनी भाष्य केले. ते म्हणाले की, अजितदादांनी फार चांगलं उत्तर दिले आहे. कारण शेवटी आई असणं आणि आई पाठिशी असणं यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असू शकतो. अजितदादा एकटे पडले आहेत, परिवाराने त्यांना वाळीत टाकलं आहे असे चित्र जे निर्माण करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमिवर आईच्या आशीर्वादाशिवाय आणखी मोठं काय आहे.

follow us