Download App

Supriya Sule : अजितदादा माझे मोठे बंधू पण…, संसदेत सिंचन घोटाळ्यावर बोलल्यानंतर सुळेंचं स्पष्टीकरण

  • Written By: Last Updated:

Supriya Sule on Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना अजित पवारांच्या (Ajit Pawar) सिंचन घोटाळ्याबाबत ( Irrigation scam ) सुळेंनी संसदेत घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अजितदादा माझे मोठे बंधू आहेत. पण मी संसदेत उपस्थित केलेल्या सिंचन घोटाळ्याबाबतचा मुद्दा हा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर भ्रष्ट पक्ष म्हणून आरोप केला. म्हणून त्यांना प्रश्न विचारण्यासाठी केला. असं सुळे म्हणाल्या.

शिंदेंच्या मतदारसंघात भाजपाची घुसखोरी? रोहित पवार म्हणाले, श्रीकांत शिंदेंसह सर्वच खासदार..

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

अजितदादा (Ajit Pawar) माझे मोठे बंधू आहेत. तसेच माझ्यावर झालेल्या संस्कारांनी मला मोठ्या भावाचा मान सन्मान ठेवण्याचं शिकवलेलं आहे. त्यामुळे मी अजितदादांविरोधात आक्रमक भूमिका मांडणार नाही. तसेच मी संसदेत उपस्थित केलेल्या सिंचन घोटाळ्याबाबतचा मुद्दा हा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर भ्रष्ट पक्ष म्हणून आरोप केला.

Supriya Sule : भाजप खासदाराविरुद्ध सुळेंनी दिली हक्कभंगाची नोटीस, नेमका वाद काय ?

त्यानंतर आता त्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक गट त्यांच्यासोबत गेला आहे. मग आता त्यांनी आधी केलेल्या आरोपांचं काय? ते आरोप राजकीय होते की, खरे होते की, खरे होते. कारण आता त्यांच राष्ट्रवादीसोबत आहात. तर आता तुम्ही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत नाही आहात. मग विरोधात असताना केलेल आरोप केवळ सूडाचं राजकारण होतं का?

त्यामुळे भाजपने केलेले आरोप जर ते खरे असतील त्याचा तपास व्हायला हवा. तसेच जर ते खोटे असतील तर भाजपने आमची माफी मागावी. कारण त्यांनी बेफामपणे आमच्या पक्षांच्या नेत्यांच्या घरावर नातेवाईकांवर धाडी टाकल्या त्यांच्या कुटुंबांना त्रास दिला. त्यामुळे त्यांनी माफी मागावी.त्यामुळे त्यांनी माफी मागावी. अशी मागणी यावेळी सुळे यांनी केली.

सिंचन घोटाळ्याची चौकशी करा…

सुप्रिया सुळे यांनी संसदेत बोलताना पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रातील सिंचन आणि कथित बॅंक घोटाळ्याबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, ‘पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराविरोधात तीव्रतेने बोलतात. मग त्यांना माझी विनंती आहे. की त्यांनी हाराष्ट्रातील सिंचन आणि कथित बॅंक घोटाळ्याबाबत चौकशी करावी.’ असं त्या म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण अजित पवार भाजपसोबत गेल्यापासून आता पर्यंत सुळे यांनी अजितदादांविरोधात एवढी आक्रमक भूमिका घेतली नव्हती.

Tags

follow us