Supriya Sule On NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. विलीनीकरणासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आमदारांशी चर्चा करुन त्यांची भूमिका जाणून घेत असल्याची देखील आतापर्यंत माहिती समोर आली आहे. तर आता या विषयावर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, विलीनीकरणाच्या चर्चांचा मला आता कंटाळा आला आहे. माझा भाऊ (अजित पवार) होता तोपर्यंत विलीनीकरणाची (NCP Merger) चर्चा होती. तारीखही ठरली होती मात्र ज्या दिवशी माझा भाऊ गेला त्या दिवशी विलीनीकरणाबाबत माझ्या मनात आणि माझ्या पक्षात फुल स्टॉप झाला. ज्या दिवशी संघटनेतील पदाधिकारी आणि माझा अजितदादा यांच्याशी चर्चा झाली होती. त्याचे तुम्ही व्हिडिओ देखील बघितले आहे. ज्या दिवशी भाऊ गेला त्या दिवशी विलीनीकरणाला फुल स्टॉप झाला. आमच्याकडून एकही स्टेटमेंटनंतर केलेलं नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जे स्टेंटमेंट आले त्याला देखील आम्ही काऊंटर केलेलं नाही. जे आमचं पुढे जायचं ठरलं होतं ते अजितदादांसोबत ठरलं होतं. काही गोष्टी हृदयातून होतात असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विलीनीकरणाच्या चर्चांवर आज जे काही आहे ते प्रश्न विचारुन टाका, आज काय ते होऊन जाऊ द्या. यापुढे मी विलीनीकरणावर बोलणार नाही. या चर्चांवरुन मला कंटाळा आला आहे असं देखील यावेळी सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं.
तर दुसरीकडे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील सध्या विलीनीकरण नको अशी भूमिका घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांनी याबाबत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना देखील माहिती दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र नको अन्यथा भविष्यात आमच्या अस्तित्वातचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
यशराज फिल्म्सची हॉररपटांच्या दुनियेत एन्ट्री; वरुण धवन साकारणार भयपटाचा नायक
आमची सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला मान्यता नाही असं सुनेत्रा पवार यांच्याकडून महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना कळवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
