सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपद? पवारांच्या भाजपसोबतच्या कथित डीलच्या चर्चेने राजकारणात खळबळ

Supriya Sule sharad Pawar and BJP शरद पवारांनी सुप्रिया यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या मागणीचा दावा ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने केला आहे.

Supriya Sule Sharad Pawar And BJP

Supriya Sule Sharad Pawar And BJP

Supriya Sule for Chief Minister Speculation over alleged deal between Pawar and BJP creates stir in politics : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? आणि शरद पवार हे भाजपसोबत जाणार का? याची. याला दुजोरा देणाऱ्या घटना आणि वक्तव्य वारंवार माध्यमांतून सोशल मिडीयातून समोर येत आहेत. यात आघाडीवर असतात त्या भाजपच्या डिलीमिटेशन बिलला पाठिंबा देणारी वक्तव्य करणाऱ्या सुप्रिया सुळे. यातून आता शरद पवार आणि सुप्रिया सुळेंबाबत एक मोठा दावा करण्यात आला आहे.

सुळेंना मुख्यमंत्रीपद? पवारांच्या भाजपसोबतच्या कथित डीलची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याचा दावा ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने केला आहे. भाजपसोबत सुरू असलेल्या कथित बोलणीच्या पार्श्वभूमीवर हा दावा करण्यात आला आहे. या वृत्तानुसार, शरद पवार हे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील होण्यासाठी बॅक-चॅनल बोलणी करत आहेत.

वंचितला भाजपची ‘बी टीम’ ठरवणारे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर गप्प का? अंजली आंबेडकर संतापल्या

या बोलणीत भाजपकडून सुप्रिया सुळे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, पवार यांनी त्याऐवजी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. या बदल्यात पवार हे सीमांकन (Delimitation) आणि महिला आरक्षण विधेयकासाठी NDA ला पाठिंबा देतील, असा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. या विधेयकांसाठी भाजपला संसदेत दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे.

Nvidia मध्ये जेन्सन हुआंग यांचं जोरदार कमबॅक! कथित प्रेमप्रकरणानंतर हुआंग पुन्हा CEO पदी

दरम्यान, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच या चर्चा फेटाळल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, कॅबिनेटमध्ये जाण्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. विधेयक आल्यानंतर पक्ष आपली भूमिका स्पष्ट करेल. राष्ट्रवादी काँग्रेस (SP) कडूनही असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगण्यात आले आहे. भाजपकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची चर्चा दिवाळीपासून सुरू आहे. मात्र, नेतृत्व आणि आमदारांच्या संख्येवरून यात अडचणी असल्याचे बोलले जात आहे.

 

Exit mobile version