Download App

…तर गृहखातं काय झोपा काढतय का?, आमदार सुरेश धस यांच्या टिकेवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

सुरज चव्हाण यांनी 'एक्स' पोस्ट शेअर करत सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, स्व. संतोष देशमुख यांच्या

  • Written By: Last Updated:

Suraj Chavan on Suresh Dhas : परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. (Suraj Chavan ) या मोर्चातील सभेतून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अजित दादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया? असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. सुरेश धस यांनी अजित पवार यांना घेरताच राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत. मग गृह खातं झोपा काढत आहे का? असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी विचारला आहे.

अजितदादा क्या हुआ तेरा वादा…सुरेश धसांचा परभणीतून हल्लाबोल, मुडेंनाही सुनावलं

सुरज चव्हाण यांनी ‘एक्स’ पोस्ट शेअर करत सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आमदार सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. परभणीच्या सभेत अजितदादांना क्या हुआ तेरा वादा… म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश धस यांना माझा प्रश्न आहे. आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत. मग गृह खातं झोपा काढत आहे का? निष्पक्ष चौकशी होईल म्हणून तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? स्व. संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जरी नेता, कार्यकर्ता जर चौकशीत दोषी आढळला तर अजितदादा त्यांच्यावर कार्यवाही करायला गय करणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलय.

बदमान करण्याचं काम केलं

सुरज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत इशारा देखील दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे. आमदार सुरेश धस यांना आवरावे. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम ते करत आहेत. विनाकारण अजितदादांना या प्रकरणात बदमान करण्याचं काम केलं तर जशास तस उत्तर आम्ही देऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे.

फडणवीसजी आपल्या पक्षाचे आमदार श्री सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात क्या हुआ तेरा वादा अजितदादा अशा प्रकारे वक्तव्य करुन आदरणीय अजितदादाविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार? त्याचबरोबर आमदार मिटकरी यांनीही फडणवीस यांना सवाल केलाय. देवेंद्र फडणवीसजी आपल्या पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी ‘क्या हुआ तेरा वादा अजितदादा’, अशा प्रकारे वक्तव्य करुन आदरणीय अजितदादाविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार? की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार? असं असं म्हटल आहे.

follow us