Suraj Nikam Suicide: राहत्या घरात गळफास घेऊन ‘कुमार महाराष्ट्र केसरी‘ सूरज निकम (Suraj Nikam) याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.
28 जून (शुक्रवारी) दुपारी 1 वाजता ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. युवा पैलवानाच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त येत आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी गावात सूरज निकम राहत होता. त्याने शुक्रवारी 28 जून रोजी दुपारी 1 च्या सुमारास आत्महत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मात्र अद्याप आत्महत्येचे कारण समोर आलेला नाही.
सांगली जिल्हयात सूरज निकम हा नामवंत मल्ल होता. त्याने कमी कालावधीत कुस्ती क्षेत्रात अनेक किताब पटकविले आहे. नुकतंच त्याने ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ चा ‘किताब देखील पटकवला होता.
IND vs SA 2024 : भारतासह आफ्रिकेचाही टेन्शन वाढणार, फायनलमध्ये धो धो पावसाचा अंदाज!
काही दिवसापूर्वी सूरजच्या वडिलांचा निधन झालं होतं त्यामुळे तो व्यथित झाला होता पोलिसांनी निधनानंतर त्याचा मृतदेह विटा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर शनिवारी दुपारी त्याचे बंधू आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार अशी देखील माहिती समोर आली आहे.
आनंदाची बातमी! शिंदे सरकार ‘या’ कुटुंबांना देणार वर्षाला 3 मोफत सिलेंडर