सुनेत्रा पवारांच्या पराभवाचा पहिला झटका युगेंद्र पवारांना; कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवणार

सुनेत्रा पवारांच्या पराभवाचा पहिला झटका युगेंद्र पवारांना; कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवणार

Yugendra Pawar removed as president Kustigir association after Sunetra Pawar defeat : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील लढतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. तर उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांचा पराभव झाला आहे. त्याचा पहिला झटका कुटुंबातून सुप्रिया सुळेंना पाठिंबा देणारे अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार ( Yugendra Pawar ) यांना बसला आहे. कारण आता युगेंद्र पवार यांना कुस्तीगीर संघटनेच्या ( Kustigir association ) अध्यक्षपदावरून हटवण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Gullak 4: ‘गुलक सीझन 4’ सिरीज ओटीटीवर होणार रिलीज, कधी आणि कुठे पाहाल चित्रपट? जाणून घ्या सविस्तर

दरम्यान यावर स्वतः युगेंद्र पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आपल्याला कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र अद्याप माझ्यापर्यंत कुस्तीगीर संघटनेचे कोणतेही कायदेशीर पत्र आलेलं नाही. ही केवळ चर्चा आहे. यात सत्य असेलच असं नाही.

लोकसभेच्या यशानंतर नाना पटोले विधानसभेच्या तयारीला; काँग्रेस 150 जागा लढवण्याची थेट घोषणा

तसेच गेल्या तीन चार वर्षांपासून मी कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. मोठ्या कुस्ती स्पर्धा आम्ही घेतलेल्या आहेत. त्यामुळे ही फक्त चर्चा आहे. अजून काहीही झालेलं नाही. तोपर्यंत यावर बोलणं उचित ठरणार नाही. माझ्याकडे ऑफिशियल काही आलं तर मी अजित पवार यांना नक्की भेटेन. असं देखील यावेळी युगेंद्र पवार म्हणाले आहेत.

दरम्यान बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान, पवार कुटुंबामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. एकीकडे अजित पवार यांनी मतदारसंघात सुनेत्रा पवारांसाठी झंझावात प्रचार केला. बारामतीतील दौंड, इंदापुर, तालुक्यांमध्ये अजितदादांनी जाहीर सभांचा धडाकाच मारल्याचं दिसून आलं होतं. तर शरद पवार गटाकडूनही जाहीर सभा घेत प्रत्युत्तर दिलं जात होतं. या जाहीर सभांच्या माध्यमातून अजितदादांनी ‘भावनिक’ मुद्द्यावरुन शरद पवार गटाला चांगलच धुतल्याचं दिसून आलं. तर शरद पवार गटानेही सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज