लोकसभेच्या यशानंतर नाना पटोले विधानसभेच्या तयारीला; काँग्रेस 150 जागा लढवण्याची थेट घोषणा

लोकसभेच्या यशानंतर नाना पटोले विधानसभेच्या तयारीला; काँग्रेस 150 जागा लढवण्याची थेट घोषणा

Congress fought 150 seats in vidhansabha says Nana Patole : लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आणि अनेक पक्ष नेतृत्वांच्या प्रभाव समोर आला आहे. त्यात भाजपला दोन आकडी संख्याही गाठता आली नाही इतका दारून पराभव झाला आहे. तर एकीकडे काँग्रेस ( Congress ) एका जागेवरून 13 जागांवर पोहचत राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभेत ( vidhansabha ) काँग्रेस पक्ष 150 जागा लढवणार अशी थेट घोषणाच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी केली आहे.

‘ब्रँड मोदी’ महराष्ट्रात फेल! 17 मतदारसंघात PM मोदींच्या सभा; विजय मिळाला फक्त तिघांनाच..

एका वृत्तपत्राला मुलाखत देताना नाना पटोले यांनी आगमी विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसचा प्लॅन सांगितला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि तीनही पक्षांना चांगली कामगिरी केली. मात्र सुरूवातीला जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात साडे तीन महिन्यांचा वेळ गेला. त्यामुळे प्रचाराच्या कामांना म्हणावास वेळ मिळाला नाही.

Prerna Arora: बॉलीवूडमधील लैंगिक असमानतेवर निर्माती प्रेरणा अरोरा पहिल्यांदाच बोलली; म्हणाली…

त्यामुळे आता विधानसभेत तसे करून चालणार नाही. हा विलंब टाळण्यासाठी आगामी विधानसभेसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला येत्या महिनाभरात ठरवावा लागेल. तसेच त्यानंतर आतापासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे. अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. त्याचबरोबर यावेळी आगामी विधानसभेत ( vidhansabha ) काँग्रेस पक्ष 150 जागा लढवणार अशी थेट घोषणाच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी केली आहे.

दरम्यान लोकसभेतील यशानंतर जोरदार चर्चा आहे ती कांग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची. कारण 2019 ला फक्त एका जागेवर यश मिळालेलं असताना पटोलेंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेसने चांगली मुसंडी मारली आहे. 1 जागेवरून थेट 13 जागांवर पोहचले आहेत. यामध्ये प्रामुख्याने लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, एकटा चलो चालणार नाही हे लक्षात घेऊन बेरजेच्या राजकारणराला महत्व दिलं. मात्र, काँग्रेस पक्षाने आपल्या मूळ विचारधारेपासून कधीच फारकत घेतली नाही. त्याचा मोठा प्रभाव मतदारांवर दिसला आणि आज एका जागेवरचा पक्ष दोन आकडी संख्येत जाऊन पोहचला आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या नेतृत्वावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झालं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज