Suresh Dhas on Narco test Mahadeo Munde Murder case Beed : बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणामध्ये मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर आयपीएस पंकज कुमावत यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा पुरवणी जबाब घेतला आहे. त्यानंतर आता ब्रेन मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
मला ते ज्ञानेश्वरी ताईंच्या बंधूंनी काही माहिती सांगितली. मात्र ती पूर्णपणे सांगितलेले नाही. या प्रकरणाच्या तपासाचे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा पुरवणी जबाब घेतला आहे. मला वाटतं पुरवणी जबाब त्या ठिकाणी घेतला होता आणि त्या घेतल्याच्या नंतर त्यांनी काही नावं सांगितले होते त्यांची ब्रेन मॅपिंग तपासणी आज झालेली आहे आणि उद्या काय साडेअकरा किंवा परवा वेळ दिलेले आहे. मला माहित नाही. माझं मत असा आहे की, याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह आलं काय निगेटिव्ह आलं हे लगेच त्याच्यामध्ये बोलण्यापेक्षा दोन्ही तपासणी जे आहेत पूर्ण होऊन द्याव्यात आणि त्याच्यामध्ये राज्याच्या गृह खात्यावरती पूर्ण विश्वास आहे. ते शंभर टक्के त्यांच्या वरती जे जे पॉसिटीव्ह येतील त्यांच्यावरती ॲक्शन होईल.
नेमकं प्रकरण काय?
परळी तहसील कार्यालयासमोर भर रस्त्यात महादेव मुंडे यांचा खून झाला होता. घटनेला अडिच वर्षे उलटले तरी आरोपी मोकाटच फिरत आहेत. न्यायासाठी किती वाट बघायची? अशी भूमिका महादेव मुंडेंच्या पत्नीने घेतली होती. याप्रकरणी त्यांनी आमरण उपोषणाला बसल्या होत्या. महादेव दत्तात्रय मुंडे हे मुळचे परळी तालुक्यातील भोपळा गावाचे रहिवासी होते. पेशाने व्यावसायिक असलेले मुंडे 2022 च्या आसपास ते आंबेजोगाई या ठिकाणी राहण्यास गेले. पण 22 ऑक्टोबर 2023 या दिवशी परळी तहसीलदार कार्यालयासमोर त्यांचा खून झाला. त्यानंतर परळीतील वनविभागाच्या कार्यालयासमोरील आवारात त्यांचा मृतदेह आढळला होता. धारदार शस्त्रांनी वार करत महादेव मुंडे यांचा खून झाल्याचे समोर आले होते. प्राथमिक तपासानुसार आर्थिक व्यवहारातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते.
