बीड : ज्याप्रकारे तुम्हाला राजकीय आणि कौंटुबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यातून आपण शांतपणे बाहेर आला. त्याला तोडच नाही. तुम्ही बिनजोड पैलवान आहात असे म्हणत भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhus) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अक्षरक्षः कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले फडणवीस माझ्यामागे दत्त म्हणून उभे आहेत. फडणवीस म्हणजे ‘बिनजोड पैलवान’ असून, देशमुख हत्या प्रकरणात फडणवीसांची कणखर भूमिका सर्वांनाच आवडली. ते आष्टीतील कार्यक्रमात बोलत होते. (Suresh Dhus On Devendra Fadnavis)
मेरे पास देवेंद्र फडणवीस है
उपस्थितांना संबोधित करताना धस म्हणाले की, मी कॉलेजमध्ये असताना दिवार सिनेमा पाहिला होता. त्यात अमिताभ आणि शशी कपूर भाऊ भाऊ असतात. निरुपा राय त्यांची आई असते. शशी कपूर इन्सपेक्टर असतो. अमिताभ शशी कपूरला म्हणतो, मेरेपास गाडी है, बंगला है, नोकर है, चाकर है तुम्हारे पास क्या है… त्यावेळी शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है. तसा आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय. तुमच्यासारखा नशिबवान कोणी नाही.
मी आण्णा म्हणते पण तुम्ही मला ताई म्हणत नाही; बीडमध्ये पंकजांची धसांबाबत खंत
भाषण करताना धस झाले भावूक
कणखर भाषण करता करता धस अचानक भावूक झाले. ते म्हणाले की, माझी आई गेली. वडील गेले. माझी दुसरी आई जिवंत आहे. माझी आई मी लपवली नाही साहेब. सभागृहात मी विचारलं माझ्या आईचं नाव घेऊ का. मी माझ्या दुसऱ्या आईचंही नाव घेतलं. साहेब, तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं मला काही तरी मिळेल. मला अनेकजण हिणवतात काय आहे याच मुख्यमंत्र्यांपाशी तेव्हा मी सांगतो मेरे पास मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेब का आशीर्वाद आहे. त्यामुळे हा आशीर्वाद असाच ठेवा अशी मागणी धस यांनी यावेळी फडणवीसांना केली.