Swapnil Lonkar in the field to build the dream ward : मांजरी बुद्रुक-केशवनगर येथील नव्याने निर्मित प्रभाग क्रमांक 15 च्या सर्वांगीण आणि सुनियोजित विकासासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. लाडक्या बहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाईच्या स्वप्नातील प्रभाग घडवण्याची धडपड निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार संदीप लोणकर यांनी व्यक्त केला आहे. या विकासासाठी मतदारांनी एक संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रचाराच्या निमित्ताने संदीप लोणकर यांनी केशवनगर वाय जंक्शन, रेणुका माता मंदिर परिसर, लोणकर वस्ती तसेच परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये पदयात्रा काढून मतदारांशी थेट संवाद साधला. या पदयात्रेदरम्यान नागरिकांनी आपल्या समस्या, अपेक्षा आणि विकासाच्या सूचना मांडल्या. यावेळी अनेक ठिकाणी महिलांनी उमेदवाराचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले.
ठाकरेंना फायदा पण, राज इतिहासातील मोठ्या पराभवाचा धनी ठरतील; फडणवीसांची भविष्यवाणी
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या नवनिर्मित प्रभागाच्या विकासासाठी शिवसेनेला संधी देण्याचे आवाहन करण्यात आले. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि तरुणांसाठी रोजगाराभिमुख उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असे संदीप लोणकर यांनी सांगितले.
या पदयात्रेत माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, ज्येष्ठ कार्यकर्ते विशाल ढोरे, अमर घुले, सुधीर घुले, तसेच विकी माने, विजय कामठे, अक्षय तारू, दीपक कुलाळ, पंकज पवार, निळकंठ अण्णा, तेजस गायकवाड, राऊत साहेब, शैलेंद्र शेलार, चेतन जाधव, आरिफ पटेल, शंतनू सरकार, बोबडे, विशाल सूर्यवंशी, विजय कदम, श्रीधर अडकुटे, तुषार मरळ, निकिता गायकवाड, गौरीशंकर घुले, सुमीत साहिल भंडारी, ओम कांबळे, जयराम राजपूत, प्रशांत भंडारी, ज्योती गागडे, कांता हाके, मंगला शिनलकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याचे चित्र आहे.
