Download App

फोडा अन् राज्य करा हेच भाजपचं काम; संभाजीराजेंची खरमरीत टीका

राज्यात भाजपकडून फोडा आणि राज्य करण्याचं काम सुरु असल्याची खरमरीत टीका स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपवर केली आहे. स्वराज्य संघटनेचा वर्धापन दिन मुंबईत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना संभाजीराजेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करीत सडकून टीका केली आहे. ‘स्वराज्य’च्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला राज्यभरातून पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

नगरकरांसाठी खुशखबर! पाइपलाइनद्वारे घरपोहच मिळणार गॅस

संभाजीराजे म्हणाले, 2019 निवडणुकीत सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते, त्यानंतर निकाला लागला पण निकालानंतर भाजप सेनेची नैसर्गित यूती होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. पण खेळखंडोबा झाल्याने दोन्ही पक्ष एकत्र आलेले नाहीत. तर दुसरीकडे पहाटेचा शपथविधी झाला त्यानंतर आता शिवसेनेत बंड झालं आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेबद्दल नेहमीच खालच्या पातळीवर जाऊन टीका-टीप्पणी केली आहे आज हे सर्वजण एकत्र असल्याचंही ते म्हणाले आहेत.

‘भारतात बसून चांद्रयान चंद्रावर उतरु शकतं, मग ईव्हीएम मार्फत मतदान…’; आव्हाडांना शंका

सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या परिस्थितीवर मला अमेरिकेत गेलो असताना तिथं मला भारतीयांकडून विचारपूस झाली. त्यानंतर महाराष्ट्रात काय चाललंय? याची मला विचारणा झाली, त्यावर मी बोललो सत्तेत राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी, सत्तेत शिवसेना विरोधात शिवसेना, पूर्वीचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आत्ताचाही शिवसेनेचाच, सध्या जे काही चाललंय देशातच नाहीतर इतिसाहासातही घडलेलं नाही, भाजपकडून तर फोडा अन् राज्य करा हेच काम सुरु असल्याची टीका संभाजीराजेंनी केली आहे.

लाथ मारुन संजय राऊतांना बाहेर काढलं पाहिजे; शिरसाटांची खालच्या स्तरावर जाऊन टीका…

भाजपला राष्ट्रवादी फोडण्याची काही गरज होती का? अलीकडच्या काळात मुख्यमंत्री म्हणतात की, शिवसेना अन् भाजपची हिंदुत्वाची युती आहे. आमची अन् राष्ट्रवादीशी राजकीय युती असल्याचं ते म्हणतात, याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं, असंही ते म्हणाले आहेत.

Sharad Pawar : पक्ष म्हणजे आमदार नाहीत, राष्ट्रवादीत फूट नाही; शरद पवारांनी पुन्हा ठणकावलं!

धनंजय मुंडेंना खोचक सवाल?
राज्याचे कृषिमंत्री आज बीडच्या सभेत आहेत. सभा घेणं आधी बंद करा अन् जिथं दुष्काळ पडलायं तिथं मदत करा, कांद्याच्या प्रश्नावर तुम्ही काहीच बोलत नाहीत. कांद्याच्या निर्यात शुल्कही वाढवलं आहे. वरही तुमचचं सरकार आणि खालीही तुमचचं सरकार आहे. विरोधात असताना जोरदार भाषणे करायचे आता तुम्हाला काय झालं? असा सवाल संभाजीराजेंनी केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=MRAtdaSU8IE

दरम्यान, राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगळं प्रोसेसिंग युनिट उभं करण्याची मागणी यावेळी संभाजीराजेंनी केली आहे. शिक्षण क्षेत्राचंही अवघड सुरु आहे. शिक्षणात सर्व काही खाजगीकरणच सुरु झाल्याची परिस्थिती असून सर्व सरकारी शाळा बंद पडत चालल्या असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us