नगरकरांसाठी खुशखबर! पाइपलाइनद्वारे घरपोहच मिळणार गॅस

नगरकरांसाठी खुशखबर! पाइपलाइनद्वारे घरपोहच मिळणार गॅस

Ahmednagar News : आजवर आपण गॅससाठी आधी मोबाईल फोनद्वारे गॅस सिलेंडर बुक करायचो व नंतर कंपनीच्या गॅस विक्रेत्याकडून आपल्याला घरी गॅस पोहच होत असायचा. मात्र आता लवकरच आपल्याला पाईपलाइनद्वारे घरपोहच गॅस मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर (Ahmednagar), श्रीगोंदे व शिर्डी येथील तब्बल 55 हजार ग्राहकांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

नगरकरांना डिसेंबरपासून थेट पाइपलाइनद्वारे गॅस मिळणार आहे. पाईपलाइनद्वारे मिळणाऱ्या गॅसमधून छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर या दोन जिल्ह्यांतील 55 हजार ग्राहकांचे दरमहा 2 कोटी 75 लाख रुपये वाचणार आहेत.

‘BRS’ चा भाजपला दणका! सोलापुरात पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत धरली हैदराबादची वाट

नगर शहरातील 20 हजार गॅस ग्राहकांना डिसेंबर महिन्यापासून थेट पाइपलाइनद्वारे गॅस मिळणार आहे. ग्राहकांच्या किचनमध्ये गॅस सुरू होण्यापूर्वी ग्राहकांना मात्र 6 हजार 550 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतरच ग्राहकांना गॅस दिला जाणार आहे. विशेष म्हणजे सध्याच्या गॅस सिलेंडरच्या तुलनेत हा गॅस स्वस्त राहील. सध्या 1150 रुपयांना गॅस टाकी मिळते. पाइपलाइनद्वारे मिळणारा गॅस हा युनिटप्रमाणे असून ग्राहकांना महिन्याला केवळ 500 रुपये लागतील, युनिट प्रमाणे मिळणाऱ्या गॅसमधून ग्राहकांचे महिन्याला 650 रुपये वाचणार आहे.

दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने गॅस बुकिंग व डिलिव्हरी ऑनलाइन केल्यामुळे गॅसची कटकट थांबली होती. आता ग्राहकांना बुकिंग केल्यानंतर दुसर्‍या किंवा तिसऱ्या दिवशी घरपोच गॅस टाकी दिली जाते. गॅस गळती तसेच गॅसपासून होणाऱ्या दुर्घटना होऊ नयेत तसेच ग्राहकांना आताच्या दरापेक्षा स्वस्त घरगुती गॅस मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या बीपीसीएल घराती ग्राहकांना थेट पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करणार आहे.

उरलेले 5 ते 6 आमदारही लवकरच येतील, छगन भुजबळांचा मोठा दावा

नगर शहरातील 20 हजार ग्राहकांच्या घरात गॅस मीटर बसवण्यात आले आहेत. युनिट प्रमाणे हा गॅस देण्यात येणार आहे. युनिटचे दर सध्या निश्‍चित नसले तरी, प्रत्यक्षात ज्यावेळी ग्राहकांना गॅस मिळेल त्यावेळी प्रत्येक ग्राहकांचे 650 रुपये वाचणार आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नगर शहरातील केडगाव येथील स्टेशनवर प्रत्यक्षात हा गॅस पोहोचणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube