Download App

Talathi Exam : तलाठी भरती गोंधळ : महसूलमंत्र्यांनी TCS ला धरले धारेवर

Talathi Exam : राज्यात तलाठी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परिक्षेत गोंधळ सुरु असल्याचं समोर आलं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील परिक्षा केंद्रावर अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेबद्दल संताप व्यक्त केल्यानतंर आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी टीसीएस(TCS) कंपनीला चांगलचं धारेवर धरलं आहे. मंत्री विखे पाटील यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.

फडणवीसांना जपानमध्येही मुंबई-पुण्याचा फील; मराठी भाषिकांच्या स्वागताने भारावले

मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, अकोला जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावर तांत्रिक बिघाड झाल्याने परिक्षा दोन तास उशिराने सुरु झाली. आता मात्र, टीसीएसकडून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून कंपनीकडून हे अपेक्षित नव्हतं पण दुर्देवाने घडलं असल्याचं विखे पाटील म्हणाले आहेत. तलाठी भरती प्रक्रियेत टीसीएस केंद्रावर डाटा सर्व्हरच्या समस्या उद्भभवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तिन्ही सत्रांमध्ये टीसीएसकडून बदल करण्यात आले आहेत. प्रशासकीय यंत्रणा सर्वच गोष्टींवर लक्ष ठेऊन असून कोणालाही परिक्षेपासून वंचित ठेवणार नसल्याची ग्वाहीदेखील विखे पाटलांनी यावेळी दिली आहे.

मनोहर जोशी हा ब्राम्हण मुख्यमंत्री नको म्हणून राणेंनी घेतल्या 45 आमदारांच्या सह्या; भास्कर जाधवांचा दावा

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सर्व निवासी उपजिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना परिक्षा केंद्रावर जाऊन तांत्रिक अडचणींबाबत चौकशी करण्याचे आदेश मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल विखे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Aparshkti Khurana Video : ‘तेरे लिये प्यार बहुत है’ अपारशक्तीचं नवं रॅप सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला

नेमकं काय घडलं होतं?
ऑनलाईन परिक्षा असल्याने अकोला जिल्ह्यात तलाठी भरती परिक्षा केंद्रावर काही तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं होतं. डाटा सर्व्हरमध्येच बिघाड झाल्याने केंद्रावरील 12 :30 वाजता सुरु होणारी परिक्षा 2 वाजता सुरु करण्यात आली. तसेच ज्या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांची परिक्षा होती त्यामध्ये टीसीएसकडून बदल करण्यात आले आहेत. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप करावा लागला आहे.

दरम्यान, तलाठी भरती परिक्षेत सुरुवातीपासूनच विघ्न आल्याचं दिसून येत आहेत. आधी नाशिकमध्ये हायटेक कॉपी करण्याचा प्रकार उघडकीस आला होता, त्यानंतर अकोल्यात परिक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याने 12 : 30 वाजताची परिक्षा 2 वाजता सुरु झाल्याचं समोर आलं. त्यामुळे आता पुढील काळात परिक्षा सुरळीत होणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

Tags

follow us