Download App

अंबानीच्या लग्नात तेजस ठाकरेंचा डान्स, भाजपचा विरोध अन् आदित्य ठाकरेंकडून पलटवार, म्हणाले, विरोध करणारे ..

Aditya Thackeray On Tejas Thackeray : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Aditya Thackeray On Tejas Thackeray : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये वरळीमध्ये घडलेली हिट ॲण्ड रनच्या घटनेतील आरोपीला सराकर कधी अटक करणार असा प्रश्न विचारला आहे तसेच त्यांनी अनंत अंबानीच्या (Anant Ambani) हळदी समारंभात तेजस ठाकरे ( Tejas Thackeray) यांनी केलेल्या डान्सवर देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून अंबानी आणि आमचे पारिवारिक संबंध आहेत. त्यांनी राज्यात चांगलं काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्माण केला आहे. अनेक मराठी लोकांना त्यांनी रोजगार दिला आहे. त्यांनी दुसऱ्या सारखे रोजगार गुजरातला पळवून नेलेला नाही. आमचा विरोध गुजरातला उद्योग पळवतात त्यांना आहे व्यवसायिकांना नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच भाजपचा या कुटुंबाला विरोध आहे का? याचा खुलासा भाजपने करावा असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मुलगा तेजस ठाकरे यांनी केलेला डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे भाजप (BJP) आणि शिवसेना ( ठाकरे गट) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे.

तर दुसरीकडे या पत्रकार परिषदेमध्ये पुढील तीन महिन्यात आमचा सरकार येणार आहे. आमच्या सरकारमध्ये सर्वांना न्याय मिळणार अशी ग्वाही देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिली.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, न्यायासाठी अनेक लोक मंत्रालयात येत आहे मात्र इथे देखील त्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी करायचं काय असा प्रश्न आता त्यांना पडतोय. अनेक विद्यार्थ्यांनी मला मेलवर आम्ही काय करायचं ? असा प्रश्न विचारला आहे मात्र मी त्यांना सांगतो आमचं सरकार पुढील तीन महिन्यात येत आहे. आमचं सरकार प्रत्येक व्यक्तीला न्याय देणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

रवींद्र धंगेकर पुन्हा चर्चेत, मतदारसंघात ‘लाडकी बहीण’ योजनेचा बोर्ड मात्र मुख्यमंत्र्यांचे फोटो गायब

तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) अनेक भेटीगाठी करत आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावर बोलताना ते डकवर्थ लुईसवर निवडणूक येणारे आहे. त्यांना क्रिकेटबद्दल माहिती, आम्ही काय बोलणार असं आदित्य ठाकरे म्हणाले.

follow us