Manoj Jarange On Santosh Deshmukh Case : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Case) प्रकरण गाजत आहे. संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली आणि कोणी केली. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर, निदर्यतेने हत्या करण्यात आली हे दिसत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर संपुर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. यातच फोटो व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान धनंजय देशमुख यांच्या भावनांचा बांध फुटला.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय देशमुख घरात जायची हिम्मत नाही म्हणतायत. मात्र त्यांना जावं लागेल. मी सुद्धा कठोर काळजाचा आहे. एवढी घटना, फोटो बघितल्यावर कोणी पण खचुन जाईल. त्यांना घरात जावं लागेल. बाहेर यावं लागेल. लढावं लागेल. बीमोड करायचा आहे. सुटून बाहेर येऊ द्या, गोळ्या घालून, आत राहिले तर फाशी होईपर्यंत लढावं लागेल. सुटून आले तर जशास तसं. आत राहिले तर फाशी होईसपर्यंत लढावं लागेल. असं यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, संतोष भय्याला सुद्धा आनंद वाटला पाहिजे. जबाबदारी आपली आहे. टोकाच बोलतोय मी. आपल्या हातात तेवढी एकच गोष्ट आहे. संतोष भय्याच्या मृत्यूचा बदला घेणं. त्यांना सुटून येऊ द्या जसं यायच तसं. भयंकर कृत्य आहे. इतका राग येण्यासाठी सारखी चूक नाही. तुम्हाला एवढी चीड यावी एवढं काही झालं नव्हतं. वाद, भांडण तंटा हे चालू असतं पण तिरस्कार, क्रूर हत्या करण्याएवढं काही झालेलं नाही. यांना पैसा, पद एवढच लागतं, कोणत्याही टोकाला जातील. असं देखील यावेळी जरांगे पाटील म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील 302 लावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
धनंजय मुंडेवर 302 लावा जेलमध्ये टाका
धनंजय मुंडे यांच्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, फक्त राजीनाम्याने काही होणार नाही. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर 302 लावा त्याला जेलमध्ये टाका. नाटबाजी करायला नको, जनता काही करु शकते. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय घडोमोडींना देखील वेग आला आहे.
“राजीनामा गेला खड्ड्यात, मुंडेंना थेट बडतर्फ करा”, अंजली दमानियाही संतापल्या
धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आज किंवा उद्या धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.