“राजीनामा गेला खड्ड्यात, मुंडेंना थेट बडतर्फ करा”, अंजली दमानियाही संतापल्या

“राजीनामा गेला खड्ड्यात, मुंडेंना थेट बडतर्फ करा”, अंजली दमानियाही संतापल्या

Anjali Damania : मस्साजागचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने (Santosh Deshmukh Murder Case) महाराष्ट्र सुन्न झाला. या प्रकरणी सीआयडीने दोन दिवसांपूर्वी दोषारोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात वाल्मिक कराडचा आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख केला होता. यानंतर काल संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे फोटो समोर आले. अतिशय निर्दयीपणे त्यांची हत्या करण्यात आले. घटनेचे फोटो पाहून राज्यातच संतापाची लाट उसळली आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे या फोटोंतून स्पष्ट झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना बडतर्फ का करू शकत नाही, असा सवाल दमानिया यांनी केला आहे.

दमानिया पुढे म्हणाल्या, संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून मला रात्री झोप लागली नाही. धनंजय देशमुखांनी मला मेसेज केला. ताई मला हे बघवत नाही. मी काहीतरी निर्णय घेणार आहे. मला काय बोलावं काहीच सुचेना. मी त्याला सकाळी फोन करून काही करू नको फक्त शांत राहा असे सांगितले. पण हे सांगताना दमानिया यांचेही डोळे पाणावले होते.

संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर येताच संताप; आज बीड जिल्हा बंद!

राज्य सरकारला अजूनही मुंडेंच्या राजीनाम्याची वाट पहायची आहे का. आता मला या राजकारणाचा कंटाळा आलाय. भावना, संवेदना सगळंच संपलंय या राजकारण्यांचं. त्या थर्ड क्लास कराडला अजूनही व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतेय. हा मंत्री (धनंजय मुंडे) मला नकोय म्हणून मुख्यमंत्र्यांना का सांगता येत नाही, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.

राजीनामा कसला घेताय धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरुन उचलून सरळ फेकून द्या. जर आज संध्याकाळपर्यंत धनंजय मुंडेंना बडतर्फ केले नाही तर आपण उद्या सगळ्यांनी विधिमंडळावर धडक द्यायची आणि अधिवेशन बंद पाडायचे असे आवाहन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी लढणाऱ्या लोकांनी केले आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube