Prakash Ambedkar On MVA : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकाची घोषणा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता तयारीला लागला आहे. तर दुसरीकडे महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपावर चर्चा देखील सुरू झाली आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठा दावा करत जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये गृहकलह सुरू असून ठाकरे गटाला फक्त 44 जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे. आंबेडकर यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चां उधाण आले आहे.
माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी 88 जागांपेक्षा एकही जागा कमी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि शरद पवार गटाने 244 जागांवर दावा केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला फक्त 44 जागा मिळणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून मोठा पेचप्रसंग निर्माण होऊन राजकारण होणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
तसेच यामुळे ठाकरे गटाला मोठी अडचण निर्माण होणार आहे कारण शिवसेना एकत्र असताना त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तेवढ्या यावेळी मिळणार का? हे मोठा प्रश्न आहे असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
तसेच पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात एक सर्व्हे करण्यात आला होता त्यात शिवसेनेच्या 5.3 मतदानापैकी 2.7 टक्के मतदान एकनाथ शिंदे यांच्याकडे वळल्याचे समोर आले आहे त्यामुळे जागावाटपामध्ये ठाकरे गटाला झुकते माप न मिळण्याचे हे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष निर्माण होणार आहे. असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.
क्रिकेट चाहत्यांची निराशा, एकही चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द
तर दुसरीकडे ठाकरे घटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांचा दावा फेटाळला आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून कोणतेही भांडण नाही. एवढेच नाही तर असे काही व्हायची कोणती सूतराम शक्यताही नाही. तसेच जर आंबेडकर यांनी लोकसभेचे निकाल पाहिले असते तर त्यांना आमची वज्रमूठ दिसली असेही ते म्हणाले.