क्रिकेट चाहत्यांची निराशा, एकही चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द

  • Written By: Published:
क्रिकेट चाहत्यांची निराशा, एकही चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द

IND VS BAN Live : भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये (IND VS BAN) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळल्या जात आहे. या सामन्याचा आज दुसरा दिवस होता मात्र एकही चेंडू न टाकता आजचा दिवस रद्द करण्यात आला आहे.

आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरु असल्याने पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही संघ पुन्हा हॉटेलवर परतले आहे.  दुसऱ्या दिवशी खेळ न झाल्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे तर उद्या रविवारी या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळ पुन्हा एकदा सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशी खेळ संपेपर्यंत बांगलादेशने 35 षटकांत 3 गडी गमावून 107 धावा केल्या होत्या. भारतातर्फे आकाश दीपला 2 तर रविचंद्रन अश्विनने एक विकेट घेतला आहे.

अंगावर फक्त पट्टे ओढून कोणी वाघ होत नाही खरा वाघ मातोश्रीवर, दानवेंचा CM शिंदेंना टोला

बांगलादेशकडून शादमान इस्लामने 36 चेंडूत 24 धावांची खेळी केली. कर्णधार नजमुल हुसेन शांतोने 57 चेंडूत 31 धावा केल्या तर मोमिनुल हक 81 चेंडूत 40 धावा आणि मुशफिकर रहीम 13 चेंडूत 6 धावा करून नाबाद आहे. माहितीनुसार, कानपूरमध्ये तिसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता आहे.

मोठी बातमी : इस्त्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा म्होरक्या ठार; इस्त्रायली सैन्यानं केलं कन्फर्म!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube