Download App

आव्हाडांनी संधी साधली; CM शिंदेंना भेटत ठाण्यातील विरोधकांना दिला संदेश?

प्रफुल्ल साळुंखे

( विशेष प्रतिनिधी)

गेले अनेक दिवस ठाण्यात जितेंद्र आव्हाड विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यात कमालीचे वाद सुरु आहेत. अनेक विकास कामांच्या उद्घाटन, पोलीस निरीक्षक वाद , जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महिलेची तक्रार असे अनेक विषयांवरून जितेंद्र आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यात कमालीच वितुष्ट आले आहे.

जरी या दोन्ही नेत्यांमध्ये भांडण असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम आव्हाड यांच्या सोबत जुळवून घेतलं. पण गेले काही दिवस एकनाथ शिंदे आणि आव्हाड यांच्यात वाद असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांची ताकद कमी करण्याचे काम सध्या सुरु आहे.

पुण्याचा पठ्ठ्या अजितदादांना नडणार; विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकत थेट खर्गेंना धाडली चिठ्ठी

ही पार्श्वभूमी लक्षात घेता आज मुख्यमंत्री पावसाळी अधिवेशनात  येत असताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री येणार असल्याने त्यांचे चित्रिकरण करण्यासाठी अनेक माध्यमांचे कॅमेरे सरसावले होते. ही परिस्थिती बघून यावेळी विधानमंडळ इमारती मधून बाहेर पडत असलेले जितेंद्र आव्हाड हे पेंडोल जवळ थांबले.

मुख्यमंत्री हे जवळ येताच आव्हाडांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले. त्याच वेळी मुख्यमंत्री यांच्या शेजारी आमदार संजय शिरसाट होते. शिरासाठ तुम्हाला मंत्रिपद कधी असा प्रश्न अनेक जण उपस्थित करत होते . हाच विषय कदाचित जितेंद्र आव्हाड यांनी देखील उपस्थित केला.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

आव्हाड यांनी मुख्यमंत्री यांच्या कानाजवळ जाऊन मुख्यमंत्र्यांना काहीतरी सांगितले. शिरसाट यांचा संदर्भ देत आव्हाड बोलत असल्याने शिरसाट यांना मंत्रीपद द्या ? असं तर सांगितलं नाही ना? अशी कुजबूज सुरु होती. पण मुख्यमंत्री यांच्याशी जवळीक दाखवत आव्हाड यांनी आपल्या विरोधकांना ठाण्यात काही संदेश दिला का? अशीही चर्चा यावेळी रंगली होती.

Tags

follow us