पुण्याचा पठ्ठ्या अजितदादांना नडणार; विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकत थेट खर्गेंना धाडली चिठ्ठी

पुण्याचा पठ्ठ्या अजितदादांना नडणार; विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकत थेट खर्गेंना धाडली चिठ्ठी

Congress : राज्यात मागील काही वर्षांपासून धक्कादायक राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेंचं बंड त्यानंतर वर्षभरानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत घडवून आणलेलं राजकीय नाट्य. या घडामोडी अनपेक्षित वाटत असल्या तरी आधीच प्लॅन केलेल्या होत्या. राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षाचे संख्याबळ घटल्याने विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा ठोकला. काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल हे निश्चित असतानाच यामध्ये नवा ट्विस्ट आला आहे.

विधानसभेत काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच येणार आहे. मात्र, आता काँग्रेसमध्येच स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यातूनच आता आमदार संग्राम थोपटे यांनी थेट दिल्लीला पत्र धाडले आहे. या पत्रात मला ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा थोपटे यांनी केला आहे.

Manipur Violence : ‘समान नागरी कायद्याच्या गप्पा मारताय, आधी मणिपूरकडे बघा’; राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

सुरुवातीला पहिल्या फळीतील नेत्यांच्या नावांची चर्चा होती. मात्र त्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. या शक्यतेने अनेक नवीन नावे समोर आली आहेत. त्यातच आ. थोपटे यांनी पत्र पाठवत तीस आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या पत्रामुळे काँग्रेसमध्येही खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची आज बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेतेपदावर कुणाला संधी मिळणार याचे उत्तर कदाचित या बैठकीत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच थोपटे यांनी थेट पक्षश्रेष्ठींना पत्र पाठविल्याने काही नव्या घडामोडी घडतील का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

‘मी आधीच सांगितलं होतं की, अजितदादा लवकरच’.. राऊतांनी शिंदे गटाला दिला खोचक सल्ला

काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा वरचढ

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कमी झाले आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा वरचढ दिसत आहे. शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत विधानसभेत काँग्रेसचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच येणार आहे. आता त्यावर फक्त अधिकृत शिक्कामोर्तब होणेच बाकी राहिले आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेते पदाचा चेहरा कोण असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube