HSC Exam Hall Ticket : बारावीच्या म्हणजेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेची फेब्रुवारी-मार्च 2025 च्या प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीनं जारी करण्यात आली आहेत. (Exam) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना बारावीच्या प्रवेशपत्राबाबत माहिती दिली आहे. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
उद्धव ठाकरे की राज ठाकरे; अजित पवार की एकनाथ शिंदे, रॅपीड प्रश्नांवर फडणवीसांचे फायरउत्तरं
बारावी म्हणजेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेची प्रवेशपत्र 10 जानेवारीपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. बारावीची प्रवेशपत्रं www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अॅडमिट कार्ड या लिंकवरुन डाऊनलोड करता येतील.
प्रवेशपत्रासाठी शुल्क घेऊ नये
बारावीची प्रवेशत्र सर्व उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाइन पध्दतीने प्रिंटींग करताना विद्याथ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्या शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
परीक्षेच्या ज्या अर्जांना “पेड” असे स्टेटस असेल त्यांचीच प्रवेशपत्रे ” पेड स्टेटस अॅडमिट कार्ड” या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील. अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या आणि एक्स्ट्रा सीट नंबर विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे “एक्स्ट्रा सीट नंबर अॅडमिट कार्ड ” या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील. समजा एखाद्या विद्यार्थ्याकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्व प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्रामध्ये विद्यार्थ्याचं नाव किंवा आईचे नाव, जन्मतारीख अशा दुरूस्त्या असल्यास त्या दुरूस्त्या ऑनलाइन पध्दतीने करावयाच्या असून त्याकरीता अॅप्लिकेशन करेक्शन ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी शुल्क भरावं लागणार आहे. दुरुस्त्यांना विभागीय मंडळाची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर दुरुस्त झालेलं प्रवेशपत्र करेक्न अॅडमिट कार्ड लिंकवर उपलब्ध होईल.
ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जांना “पेड” असे स्टेटस प्राप्त झालेले नाही अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे स्टेटस अपडेट होवून “लेट पेड स्टेट अॅडमिट कार्ड या ऑप्शनद्वारे प्रवेशपत्र उपलब्ध होतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे, अशा सूचना दिल्या आहेत.