शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय, नापास झाल्यावरही मिळणार पुन्हा परीक्षेची संधी

शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय, नापास झाल्यावरही मिळणार पुन्हा परीक्षेची संधी

Re-Examination :  विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून राज्य सरकारने (State Govt) विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत त्यांचा ताण कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निर्णयामुळं आता पाचवी आणि आठवीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा (re-examination) देता येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे. (Due to the decision of the Board of Education, the 5th, 8th failed students will get a chance to retake the exam)

यासंदर्भात शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये लिहिलं की, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (शैक्षणिक प्राधिकरण) इयत्ता 5 वी आणि 8 वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित करेल. त्यात पुढे असं म्हटलं आहे की, जर एखादा विद्यार्थी वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर अशा विद्यार्थ्याला संबंधित विषयात अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान केले जाईल आणि वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत त्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल.

‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ कवितासंग्रहाला ‘युवा’ अकादमी, तर ‘छंद देई आनंद’ या कवितासंग्रहाला ‘बाल’ साहित्य अकादमी 

अनेकदा विद्यार्थी परीक्षा, अभ्यास याचा ताण घेतात. नापास होण्याची भीती असल्यामुळं विद्यार्थी दडपणाखाली येतात. आपण नापास झालो तर शैक्षणिक वर्ष वाया जाईल, याचा धसका अनेक विद्यार्थी घेतात. हे टाळण्यासाठी सरकारने नापास विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानं या निर्णयाचं अनेकांकडून कौतूक केल्या जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube