Download App

नेहरूंना भेटण्यासाठी बबनरावांनी थेट दिल्ली गाठली…’चाचा मला शिकायचे आहे, पण…

Babanrao dhakne : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे(Babanrao dhakne) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र बबनराव ढाकणे हे राजकारणातलं एक मोठे नाव असून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आजवर अनेक पक्षांमध्ये काम केले आहे. एक संघर्षशील नेता म्हणून त्यांचे नाव राज्यात परिचित होते. मात्र आज या संघर्षशील योध्याचा संघर्ष अखेर थांबला असून मोठं राजकीय नेतृत्व आज हरपलं आहे. दरम्यान, बबनराव यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी थेट पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट घेतली होती. त्याबाबतचा एक किस्सा त्यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितला होता.

Priyanka Gandhi : PM मोदींवरील टीका भोवली; निवडणूक आयोगाने प्रियंका गांधींना धाडली नोटीस

नेहरूंना भेटण्यासाठी बबनरावांनी थेट दिल्ली गाठली :
बबनराव हे 14 वर्षाचे असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भेटीचा एक मनोरंजक किस्सा सांगितला होता. ते एका वसतिगृहात असताना त्यांना वसतिगृहातील एक अधीक्षक रागावले मग काय त्यांनी रागात थेट मुंबई गाठली. काही झाले तरी त्या अधीक्षकांची तक्रार चाचा नेहरूंना करायची असे मनात ठरवले व मुंबईतून दिल्लीला रेल्वेने गेले.

मुंबईतील हिरे उद्योगासह उर्वरित उद्योगही गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात; पटोलेंचा घणाघात

मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ढाकणे हे दिल्लीतील नेहरूंच्या निवासस्थानी पोहचले. दरम्यान एक मुलगा थेट नेहरूंना भेटण्यासाठी एवढ्या रात्री का आला म्हणून तेथील सुरक्षारक्षकांनी मला हटकले. मात्र मला नेहरुंना भेटायचे असे मी देखील त्यांना सांगितले. त्यांनतर त्या सुरक्षारक्षकांनी मला रात्रभर तेथेच झाडाजवळ मुक्काम करण्याचा सल्ला दिला.

Jayant Patil : ‘मोदीजी, फित कापून खुशाल श्रेय घ्या!’ ‘निळवंडे’ची आठवण सांगत जयंत पाटलांचा टोला

रात्रभर बाहेर काढल्यानांतर सकाळी नेहरु फिरायला बाहेर पडले तेव्हा गुपचूप सुरक्षारक्षकांची नजर चुकवून आपण थेट नेहरूंना भेटायला निघालो मात्र सुरक्षा रक्षकांनी मला घेरून मला अडवलं. मात्र याचवेळी नेहरुंनी माझ्याशी संवाद साधत अडचण जाणून घेतली.

Rahul Gandhi : ‘पुलवामाच्या शहीदांना श्रध्दांजली वाहण्यास गेलो तेव्हा बंदिस्त केलं’

त्यावेळी मी अवघा चौदा वर्षांचा होतो. मी त्यावेळी नेहरूंना सांगितलं की ‘मला शिकायचे आहे. पण अधीक्षक रागावतात’ ही तक्रार थेट पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे केली. त्यानंतर नेहरुंनी मला निवासस्थानात बोलवून घेतले व काकासाहेब गाडगीळ यांच्यामार्फत पुण्यात शिक्षणाची सोय केली होती.

Tags

follow us