Download App

Sada Sarvankar : गोळी आमदार सरवणकरांच्याच बंदुकीतून झाडली पण…

मुंबई : मुंबईतील प्रभादेवी परिसरात गणेशोत्सवादरम्यान झालेला गोळीबार शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी केला नसल्याची माहिती पोलिसांनी विधानपरिषदेत दिलीय. पोलिसांकडून विधानपरिषेत अहवाल सादर करण्यात आला आहे. प्रभादेवी गोळीबाराप्रकरणी आमदार सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली आहे.

Marathi Movie : मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य मंजूरीसाठी नवी समिती गठीत

प्रभादेवी परिसरात गोळीबार सुरु असताना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी गोळीबार केला असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला होती. या प्रकरणानंतर ठाकरे-शिंदे गट आमने-सामने आले असल्याचंही दिसून आलं होतं.

पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात म्हंटलं, गणेशात्सवादरम्यान पोलिसांकडून गोळीबार झाला पण हा गोळीबार आमदार सदा सरवणकरांनी केला नाही. गोळी सरवणकरांच्याच बंदुकीतून सुटली असून अज्ञात व्यक्तीकडून झाडण्यात आल्याचं अहवालात म्हटलंय.

Supriya Sule : शेतकऱ्यांना जात विचारण्यामागे केंद्र सरकारचं कटकारस्थान; सुप्रिया सुळेंचा घणाघात

अहवालामध्ये सदा सरवणकरांच्याच बंदुकीतून गोळी झाडल्याचं पोलिस तपासात उघड झालं असून गोळी मात्र सदा सरवणकर यांनी नाहीतर अज्ञात व्यक्तीकडून झाडण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

या प्रकरणी पोलिसांच्या तपासात एकूण 14 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून पोलिसांकडून या प्रकरणी प्रभादेवी परिसरातील सीसीटिव्ही फूटेजही तपासण्यात आले आहेत.

दरम्यान, सदा सरवणकरांना क्लिन चीट दिल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि सचिन आहिर यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

Tags

follow us