Download App

मंत्रिमंडळ समितीतून विखेंना डावललं; मंत्री विखे पाटील काय म्हणाले?

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे(Radhakrushna Vikhe Patil) यांना वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशातच राधाकृष्ण विखे यांनी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीत मी नसल्याने काही फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आधी समितीतून वगळलं त्यानंतर मला काही फरक पडत नसल्याचं विधान विखेंनी केल्याने त्यांच्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरु आहे.

कालीचरण महाराजांचे विचार हिंदुत्वासाठी पोषक, महाराजांना पूर्ण पाठिंबा; नितेश राणेंकडून समर्थन

मंत्रिमंडळ समितीत वगळल्यानंतर विखे म्हणाले, सर्व गोष्टींचा विचार त्यांना करावा लागतो. आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या समितीमध्ये आहेत. त्यांनी सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेतला असेल. तसेच ज्या समितीमध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मी त्या समितीत असलो, नसलो फरक पडत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले; परीक्षांच्या फीबाबत केली मोठी मागणी

तसेच देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतात तो विचार पूर्वक घेतात. समन्वय रहावे म्हणून कदाचित त्यांनी निर्णय घेतला असावा. त्या समितीत स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे मी असो किंवा नसो काही फरक पडत नाही असंही ते म्हणाले आहेत.

Sanjay Shirsat राऊतांवर भडकले म्हणाले, आपण पाकिस्तानात..

दरम्यान, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची नूकतीच निवड करण्यात आलीयं. या समितीमध्ये राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसेंसह शिंदे गटाचे उदय सामंत, अतुल सावे, दादा भुसे यांना मानाचं स्थान देण्यात आलं आहे.

मंत्रिमंडळ पायाभूत समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही समितीत असणार आहेत. या समितीमध्ये विखेंना राष्ट्रवादीच्या सत्तेत सहभागामुळेच डावलल्याची सर्वत्र चर्चा रंगत आहे.

Tags

follow us