कालीचरण महाराजांचे विचार हिंदुत्वासाठी पोषक, महाराजांना पूर्ण पाठिंबा; नितेश राणेंकडून समर्थन
Nitesh Rane on Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांवर पुण्यामध्ये शिवजयंतीला भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे. मात्र असं असतानाही भाजप नेते नितेश राणे यांनी कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांचे समर्थन केले आहे. हिंदुत्वाचा ज्वलंत आवाज आणि हिंदुत्वाबद्दल परखड मत कालीचरण महाराज मांडत आले आहेत. कालीचरण महाराजांचे विचार हे हिंदुत्वासाठी पोषक आहेत आणि हिंदुत्वाला प्रोत्साहन देणारे आहेत, त्यामुळे त्यांच्या विचारांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी सांगितले आहे.
‘मातोश्री’ची खरी मम्मी उद्या महाराष्ट्रात येतेय; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
नितेश राणे यांनी शिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाच्या मुंबईमधील बैठकीवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याचवेळी नितेश राणे यांना कालीचरण महाराज यांच्याबद्दल प्रश्न विचारला, त्यावर नितेश राणे यांनी आपला कालीचरण महाराजांच्या विचारांना पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले.
8 हजार भगिनींनी राखी बांधताच आमदार बेनकेंनी दिला शब्द, ‘हा भाऊ तुमच्या…’
कालीचरण महाराज यांच्यासोबत आपण अनेकवेळा व्यासपीठावर बसलो आहे. त्यांचे विचार ऐकले आहेत. कालीचरण महाराज म्हणजे हिंदुत्वाचा ज्वलंत आवाज, हिंदुत्वाचा ज्वलंत आवाज आणि हिंदुत्वाबद्दल परखड मत कालीचरण महाराज मांडत आहेत. कालीचरण महाराजांचे विचार हे हिंदुत्वासाठी पोषक आहेत आणि हिंदुत्वाला प्रोत्साहन देणारे आहेत.
पुण्यामध्ये कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी सखोल चौकशी करावी, त्याच्यात काही हरकत नाही, त्यांच्या विचारांमध्ये काहीही वाईट नाही, असं मी त्यांचे विचार ऐकून बोलणाऱ्यांपैकी एक आहे. त्यामुळे कालीचरण महाराजांच्या विचारांना माझा पूर्ण पाठिंबा आहे, असेही यावेळी नितेश राणे यांनी स्पष्टपणे सांगितले.