Download App

मुख्यमंत्र्यांनी केली सुलोचनादीदींची चौकशी, उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून

  • Written By: Last Updated:

मुंबई : पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषणने सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्यावरील वैद्यकीय उपचाराच्या खर्चापोटी तीन लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून रुग्णालयाला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या होत्या.

सुलोचनादीदी (९४) या श्वसनाशी संबंधित संसर्गामुळे आजारी असून दादर येथील शुश्रुषा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या आजारपणाविषयी माहिती कळल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या परिवाराजवळ चौकशी केली तसेच तातडीने उपचारासाठीचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Sharad Pawar यांनी पाठिंब्यावरुन नागालँडबाबत स्पष्टच सांगितले… 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांची सहाय्यता केली आहे. या योजनेमुळे अनेक गरजु रुग्णांना मोफत उपचार मिळाला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या आठ महिन्यांत 4800 रुग्णांना एकूण 38 कोटी 60 लाख रुपयांची मदत दिली आहे.

या योजनेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. तर दुसऱ्या ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर महिन्यात 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 8 कोटी 89 लाख तर फेब्रुवारी 2023 मध्ये विक्रमी 10 कोटी 27 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

Tags

follow us