Sharad Pawar यांनी पाठिंब्यावरुन नागालँडबाबत स्पष्टच सांगितले…

Sharad Pawar यांनी पाठिंब्यावरुन नागालँडबाबत स्पष्टच सांगितले…

मुंबई : पूर्वोत्तर भारतातील मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यातील नागालँड राज्य सध्या राजकीय घडामोडीमुळे चर्चेत आहे. कारण या राज्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजपला पाठिंबा दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने राजकीय धुरळा उडाला आहे. त्यामुळे यावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीच खुलासा केला आहे. शरद पवार म्हणाले की, नागालँडमध्ये बहुमतासाठी ३१ जागा हव्यात. तेथे सर्वात मोठा पक्ष हा एनडीपीपीला २५ जागा मिळाल्या आहेत. त्यांना आणखी ६ जागांची आवश्यकता आहे. तर भाजपला १२ आणि राष्ट्रवादीला ७ जागा मिळाल्या आहेत. नागालँडमध्ये स्थिर सरकार यावे म्हणून आम्ही तेथील मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. भाजपला (BJP) नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राजकीय चर्चेला एकप्रकारे पूर्णविराम दिला आहे.

नागालँडमध्ये विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. बहुमतासाठी ३१ जागांची गरज आहे. त्यापैकी सर्वाधिक जागा या स्थानिक एनडीपीपी २५ या पक्षाला मिळाल्या आहेत. तर त्या खालोखाल भाजपला १२ आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७, एनपीपीला ५ जागा तर इतर ९ जण निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी एनडीपीपी या पक्षाला आणखी ६ जागांची आवश्यकता आहे.

Sharad Pawar : माझ्या जन्माच्या तिसऱ्या दिवशीच आईने मला सभागृह दाखवलं!

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचा नागालँडमध्ये सत्ता स्थापण्यासाठी भाजपला पाठिंबा म्हणून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली जात आहे. त्यावर खुलासा करताना खुद्द शरद पवार यांनी माध्यमासमोर राष्ट्रवादीची भूमिका मांडली. शरद पवार म्हणाले की, आम्ही नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा दिलेल्या नाही. तर नागालँडमध्ये स्थिर सरकार यावे यासाठी एनडीपीपी या पक्षाला पाठिंबा दिला आहे. भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही स्थानिक पातळीवर पक्षाच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांना मदत करा म्हणून सांगितले आहे, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube