मुंबईतील मालवणी पोलिसांनी एका अशा व्यक्तीला अटक केली आहे, जो फेसबुकवर महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून, त्यांच्याशी ऑनलाइन चॅट करून आणि तिचे तिच्या नवऱ्याशी आणि सासूशी पटत नाही असे भविष्यवाणी करून तिचा विश्वास जिंकायचा आणि मग तिला कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलवायचा.
अशीच एक महिला त्याच्या जाळ्यात अडकली. त्याने महिलेचा विश्वास जिंकून तिला मार्वे बीचवर फिरायला बोलावले, तिच्या जवळ गेला आणि त्यांच्यासोबतचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेकडून तिच्या अश्लील व्हिडिओच्या नावाखाली 33 लाख रुपये घेतले होते, त्यानंतर महिलेला आपल्यासोबत काहीतरी चुकीचे घडत असल्याचे लक्षात आले.
भोंदूबाबा अशोक खरातची संपत्ती किती?, आकडा ऐकून बसेल धक्का…
18 तारखेला आपली चूक लक्षात आल्यावर त्या महिलेने आपल्या पतीला आत्महत्येचा संदेश पाठवला, त्यानंतर तिचा पती घरी आला आणि पत्नीची संपूर्ण कहाणी ऐकून त्याने मालवणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. याबाबत बोलताना मालवणी पोलिस स्टेशनचे सहा पोलिस निरीक्षक दीपक जमदाडे यांनी सांगितले की, आरोपी भोंदूबाबा किंवा ज्योतिषी नाही.
तो मीरा रोड येथे राहणारा एक ड्रायव्हर आहे. त्याने फेसबुकवर महिलेशी मैत्री केली आणि नंतर, तिला बाहेर घेऊन जाण्याच्या बहाण्याने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला, तिच्याकडून 33 लाख रुपये घेतले आणि तिला ब्लॅकमेल करत होता. आता आरोपीला अटक करण्यात आली आहे या आरोपीचे नाव अमर महागावकर आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
