मुंबई : समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबासाठी वेळ देताच येईल याबद्दल काही सांगता येत नाही. त्यातल्या त्यात राजकारणी व्यक्तींना तर नाहीच नाही. ज्या दिवशी कुटुंबासोबत घरी असायला हवं त्याच दिवशी नेमकं काही तरी महत्त्वाचं काम येतं अन् त्यांना घराबाहेर पडावं लागतं. त्यामुळं बऱ्याचदा घरातील माणसं नाराज होतात. ठाकरे गटाच्या (Thackeray Group) फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)यांची अवस्थाही काहीशी अशीच झालीय. त्याच्या लाडक्या लेकीचा (कब्बूचा) वाढदिवस असूनही त्यांना वेळेत घरी पोहोचता आलं नाही. त्यामुळं त्यांच्या मनाची घालमेल झाली. ही घालमेल त्यांनी फेसबुक पोस्टमधून (Facebook Post)व्यक्त केलीय. मन हेलावणारी अशी ही पोस्ट आहे.
सुषमा अंधारे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
शिवगर्जना सप्ताहाच्या सलग सभा सुरु आहेत.. वरळीची सभा संपवून वायुवेगाने मन लेकीकडे धावतंय… पण लोणावळा घाटातील ट्रॅफिक जणू माझा रस्ता अडवून थांबलंय… दीड दोन तासांपूर्वीचा कणखर लढावू बाणा गळून पडलाय… समोरची अजस्त्र वाहनांची अस्ताव्यस्त ट्रॅफिक बघून “पराधीन जगती पुत्र मानवाचा या ओळींची यथार्थता अनुभवतेय…
अर्थसंकल्पीय अधिवेशन! सत्ताधारी-विरोधक भिडणार
12 वाजलेत… लेकीचा वाढदिवस आहे… आत्ता या क्षणाला मी तिच्या सोबत असायला हवं… अर्थात् नसले तरी रुसण्या इतकं फुरंगटून बसण्या इतकं कळतं वय तरी कुठे आहे म्हणा..? पण जो वसा हातात घेतलाय तोही तितकाच महत्वाचा…!
आता जी मनाची घालमेल होतेय ती कदाचीत फक्त रुपाली पाटील ठोंबरे ही मैत्रीणच समजू शकेल..! कारण 11 फेब्रुवारीला तिच्या विरूचा वाढदिवस होता. कब्बुपेक्षा फक्त 16 दिवसांनी मोठा आहे तो… अन् त्याच्या वाढदिवसाला इच्छा असूनही कामामुळे रूपाली पोचू शकत नव्हती. वरुन कितीही खमकेपणा दाखवला तरी त्यादिवशी फ्लाईटमध्ये तिचा रडवेला चेहरा अन् आरक्त डोळे तिच्यातल्या व्याकूळ आईचं काळीज डोकावत होतं…
असो भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते.. याक्षणी शिवसैनिकांनी रक्ताच पाणी करुन वाढवलेली शिवसेना बेइमानांच्या कपटजालात अडकली आहे ती सोडवलीच पाहिजे… लेकीचा वाढदिवस शिवसैनिक मामा शहरप्रमुख आनंद गोयल, गजानन थरकुडे, निलेश जठार, अक्षय सागर माळकर हे सगळे आहेतच त्यामुळं फिकर नॉट…
Love you pillu… Mumma loves you lot..
Wish you a very happy birthday Shona…